VIDEO: हृतिकच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंड सबाची खास पोस्ट; लिपलॉक करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Hrithik Roshan Birthday: हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादने (Saba Azad) एक खास व्हिडीओ शेअर करुन हृतिकला शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Hrithik Roshan Birthday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आज 50 वा वाढदिवस आहे. हृतिकच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या चाहत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेक जणांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादनेही (Saba Azad) एक खास व्हिडीओ शेअर करुन हृतिकला शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सबानं शेअर केला व्हिडीओ
हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक आणि सबा हे बाल्कनीत उभे राहिलेले दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही लिप लॉक करताना दिसत आहेत. या रोमँटिक व्हिडीओला सबानं खास कॅप्शन देखील दिलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह." सबा आझादने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
हृतिकच्या एक्स वाईफ सुझान खाननं देखील खास पोस्ट शेअर करुन हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुझान खाननं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हृतिक आणि त्याच्या मुलांचे काही खास फोटो आहेत. या फोटोला सुझाननं कॅप्शन दिलं, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू 50 व्या वर्षी देखील 30 वर्षाचा दिसतो."
View this post on Instagram
हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी 2000 मध्ये लग्नगाठ बांधली. पण या जोडप्याने 2014 मध्ये घटस्फोट घेतला. सुझान आणि हृतिक रोशन यांना दोन मुले आहेत. सुझान गेल्या काही वर्षांपासून अरसलान गोनीला डेट करत आहे, तर हृतिक रोशन हा काही महिन्यांपासून अभिनेत्री आणि गायिका सबा आझादला डेट करत आहे.
हृतिक रोशनचा आगामी चित्रपट
हृतिक रोशन लवकरच 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटामध्ये तो दीपिका पदुकोणसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट जानेवारीतच प्रदर्शित होणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: