एक्स्प्लोर
अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांना 21 वं ऑस्कर नामांकन
स्टीव्हन स्पिल्सबर्ग दिग्दर्शित 'द पोस्ट' चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या भूमिकेसाठी मेरील स्ट्रीप यांना नामांकन मिळालं आहे.

न्यूयॉर्क : हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम मोडित काढला आहे. अत्यंत मानाच्या ऑस्कर अर्थात अकॅडमी अवॉर्ड्ससाठी मेरिल यांना 21 व्यांदा नामांकन मिळालं आहे. 'द पोस्ट' चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या व्यक्तिरेखेसाठी यावर्षी मेरील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळालं आहे.
मेरीलसोबत सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर), फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (थ्री बिलीबोर्ड्स आऊटसाईड एबिंग, मिसौरी), मार्गोट रॉबी (आय, टॉन्या), साओर्स रोनान (लेडी बर्ड) या अभिनेत्री स्पर्धेत आहेत. स्टीव्हन स्पिल्सबर्ग दिग्दर्शित 'द पोस्ट' चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या भूमिकेसाठी मेरील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे, त्यामुळे त्या तगड्या दावेदार मानल्या जात आहेत.
68 वर्षीय मेरिल स्ट्रीप यांच्या नावे गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक ऑस्कर नामांकन पटकवण्याचा विक्रम आहे. यंदा त्यांना मिळालेल्या नामांकनाच्या संख्येत एकाने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ऑस्कर नामांकनांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर दोघींमध्ये टाय आहे. अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न आणि अभिनेते जॅक निकोलसन यांना प्रत्येकी 12 नामांकनं आहेत.
अभिनेत्री मेरिल स्ट्रीपचा विक्रम, ऑस्करसाठी 20 व्यांदा नामांकन
यापूर्वी मिळालेल्या 20 नामांकनांपैकी तीन पुरस्कार मेरिल यांना मिळाले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे दोन, तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या एका ऑस्करचा समावेश आहे. 1979 मध्ये मेरील यांना पहिल्यांदा ऑस्कर नामांकन मिळालं होतं. 1980 मधील क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर या चित्रपटातील भूमिकेसाठी (दुसरं नामांकन) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर त्यांना मिळाला. त्यानंतर 1983 मध्ये सोफीज् चॉईस या चित्रपटासाठी (चौथं नामांकन) त्यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. 1983 नंतर तब्बल 19 वर्ष त्यांना ऑस्करने हुलकावणी दिली. 2012 मध्ये (17 वं नामांकन) द आयर्न लेडी या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. यूकेच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात मेरिल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी फ्लॉरेन्स फॉस्टर जेनकिन्स या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं ऑस्कर नामांकन मिळालं होतं. सलग दुसऱ्या वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं ऑस्कर नॉमिनेशन आहे. गेल्या दशकभरात त्यांना अभिनयासाठी सहा वेळा नामांकन मिळाली आहेत. आतापर्यंत मेरिल स्ट्रीप यांना 156 विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत, तर त्यांना मिळालेल्या नामांकनांची संख्या 389 वर पोहचली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
