Heropanti 2 Release Date: ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2'
Release Date : टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाच्या 'हीरोपंती 2' सिनेमाची चाहते गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत.
Heropanti 2 : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने 'हिरोपंती' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून लवकरच हीरोपंतीचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगरच्या 'हीरोपंती' सिनेमात कृती सेनन मुख्य भूमिकेत होती. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे. टायगरने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
'हीरोपंती 2' सिनेमात टायगर श्रॉफसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात टायगर धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. सध्या तो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सेटवरचा फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत.
View this post on Instagram
टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'हीरोपंती 2' ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. टायगरने शेअर केलेल्या फोटोमध्ये टायगर खुर्चीवर बसलेला दिसत असून त्याचा हा लूक चाहत्यांना आवडत आहे. 'हीरोपंती 2' सिनेमाचे शूटिंग लंडनमध्येदेखील करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
Karan Mehra : बिग बॉस फेम अभिनेता करण मेहराला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने केले सन्मानित
Prithviraj Movie Postponed : 'पृथ्वीराज' सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे
Sumona Chakravarti : अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला कोरोनाची लागण, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























