एक्स्प्लोर

म्हणून सनी देओल आणि शाहरुख खानमध्ये 16 वर्षांचा अबोला...

मी शाहरुखशी बोलत नव्हतो, अशातला भाग नाही. पण मी अलिप्त होतो. मी फारसा सोशल होत नाही, असं स्पष्टीकरण सनी देओलने दिलं

मुंबई : नुकताच खासदारपदी निवडून आलेला अभिनेता सनी देओल आणि किंग खान शाहरुख यांनी यश चोप्रा दिग्दर्शित 'डर' चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. त्यानंतर गेल्या सव्वीस वर्षांत ते एकदाही सिनेमात एकत्र झळकले नाहीत, इतकंच काय, दोघं सोळा वर्ष एकमेकांशी बोलतही नव्हते. नुकतंच सनी देओलने या अबोल्याविषयी स्पष्टीकरण दिलं. 'डर चित्रपटात मला एक सीन होता. शाहरुख साकारत असलेली व्यक्तिरेखा माझ्यावर सुऱ्याने वार करते. या दृश्यावरुन माझं दिग्दर्शक यश चोप्रांसोबत चांगलंच वाजलं. मी त्यांना समजावत होतो, की माझी व्यक्तिरेखा कमांडो ऑफिसरची आहे. मी फिट आहे, तर एक तरुण मुलगा इतक्या सहजासहजी मला कसा मारु शकेल. जर मी त्याला बघू शकत नसेन, तर त्याने मला केलेली मारहाण एकवेळ समजू शकतो. मात्र माझ्या डोळ्यादेखत तो मला सुरा कसा खुपसू शकेल. असं असेल तर मी कमांडो ऑफिसरची भूमिका करता कामा नये' असं सनी देओलने सांगितलं. 'यश चोप्रा यांच्या वयाचा मान राखून मी गप्प बसलो. पण मला खूप राग आला होता. मी खिशात हात घातले. मला समजलंच नाही, की रागाच्या भरात मूठी आवळताना मी माझीच पँट फाडली होती' असंही पुढे सनीने सांगितलं. Mannat Bungalow | सलीम खान यांच्या 'त्या' प्रश्नामुळे 'मन्नत' सलमानऐवजी शाहरुखच्या मालकीचं! शाहरुख खानसोबतच्या 16 वर्षांच्या अबोल्यावर सनीने मौन सोडलं. 'मी शाहरुखशी बोलत नव्हतो, अशातला भाग नाही. पण मी अलिप्त होतो. मी फारसा सोशल होत नाही. त्यामुळे आमची भेट होत नाही. साहजिकच इतकी वर्ष गाठभेट न झाल्यामुळे आमच्यात बोलण्याचा प्रश्नच आला नाही. पण मी त्याच्याशी मुद्दाम बोललो नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल' असं स्पष्टीकरण सनीने दिलं. डर चित्रपटाचा अनुभव आयुष्यातील सर्वात वाईट होता, असं 2001 साली 'फिल्मफेअर' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सनीने सांगितलं होतं. 'माझ्याशी खोटं बोलण्यात आलं. निर्मात्यांनी फसवून माझी व्यक्तिरेखा साईडलाईन केली' असा आरोप सनीने केला होता. डर सिनेमात विलनच्या व्यक्तिरेखेला मोठं करण्यात येणार आहे, हे मला सांगितलंच नव्हतं, असं तो म्हणाला होता. खलनायकाला नायक म्हणून सादर केलं. यापुढे काम करताना काळजी घेईन, असंही सनी त्यावेळी म्हणाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : एबीपी माझा हेडलाईन्स :  27 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaNana Kate on Vidhan Sabha : चिंचवडमध्ये दादांचं टेन्शन वाढलं! नाना काटेंकडून बंडखोरीची घोषणाMudyacha Bola :महायुती की मविआ पुण्यात कुणाची हवा? पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?Pimpri-Chinchwad : पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी, शिवसैनिक बंडखोरीच्या पवित्र्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुनही उमेदवारीची संधी हुकली , स्वीकृती शर्मा बंड करणार, अंधेरी पूर्वमधून अपक्ष लढणार
अंधेरी पूर्वमध्ये सेनेकडून मुरजी पटेलांना संधी? स्वीकृती शर्मांचं ठरलं, उमेदवार अर्ज भरणार, तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार
सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल
सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल
Embed widget