एक्स्प्लोर

Har Har Mahadev: 'शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल?'; जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही चित्रपटांचा उल्लेख केला आहे. 

Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन महाराष्ट्रात वाद पेटला आहे. या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सवर काही नेते आक्षेप घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल केलेल्या राड्यानंतर आज त्याच थिएटरमध्ये मनसेनं या चित्रपटाच्या स्पेशल शोचे आयोजन केले आहे. या सर्व प्रकरणानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही चित्रपटांचा उल्लेख केला आहे. 
 
'मराठ्यांच्या इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतूने? शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल?' असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टद्वारे नेटकऱ्यांसमोर मांडले आहेत. तसेच "तान्हाजी", "पावनखिंड" आणि "हर हर महादेव" या चित्रपटांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये केला आसून या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सवर टीका केली आहे. 
 
'दर 2-3 महिन्याला एक या वेगाने असे इतिहासाचा विपर्यास करणारे सिनेमे थिएटर, ओटीटी आणि टिव्हीवर येवून तरुण पिढीला खोटा इतिहास शिकवत आहेत.' असंही जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 
 
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट


Har Har Mahadev: 'शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल?'; जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल  ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो  शो बंद पाडला होता. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा शो परत सुरु केला.  आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मनसे हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसाठी मोफत ठेवणार आहे. काल ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्याच्या कुटुंबाला आज पुन्हा एकदा हा शो पाहण्यासाठी आमंत्रण दिले असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. 
 
हर हर महादेव हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, ,अमृता खानविलकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

राज ठाकरेंनी दिले मनसे प्रवक्त्यांना चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मत आहे.  राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव' चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Embed widget