Happy Birthday Rekha: वडील होते साऊथचे स्टार, वयाच्या 13 व्या वर्षी केलं अभिनय क्षेत्रात पदार्पण; जाणून घ्या एव्हरग्रीन रेखा यांचा प्रवास
Happy Birthday Rekha: आज एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या चित्रपटांबद्दल...
Happy Birthday Rekha: बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या रेखा (Rekha) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. "इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं", "दिल चीज क्या है" या गाण्यांमधील रेखा यांच्या आदाकारीनं प्रेक्षकांना घायाळ केलं. रेखा यांची ब्युटी आणि त्यांचा फिटनेस हा तरुणींना देखील लाजवेल असा आहे. आज रेखा यांचा 69 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या चित्रपटांबद्दल...
10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नई येथे रेखा यांचा जन्म झाला. रेखा यांचे खरे नाव भानुरेखा जेमिनी गणेशन असं आहे. रेखा यांच्या वडिलांचे नाव वडील जेमिनी गणेशन आणि आईचे नाव पुष्पवल्ली होते. जेमिनी गणेशन हे साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ‘रंगुला रत्नम’ या तेलुगू चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारुन रेखा यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मनं
रेखा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जुदाई, सिलसिला, सावन भादों, उमराव जान या चित्रपटांमधील रेखा यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. केवळ अभिनयच नाही तर रेखा यांच्या नृत्यशैलीनं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली.
'या' अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं नाव
रेखा यांचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्या रिलेशनशिपबाबत अनेक किस्से आजही चर्चेत आहेत. मिस्टर नटवरवाला (1979), सुहाग (1979), सिलसिला (1981), दो अंजाने (1976) या चित्रपटामध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलं. तसेच अभिनेते विनोद मेहरा यांच्यासोबत देखील रेखा यांचे नाव जोडले जात होते. रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न देखील केलं होतं, असंही म्हटलं जातं. घर या चित्रपटात विनोद मेहरा आणि रेखा यांनी काम केले होते.
वर्षभर देखील टिकला नाही संसार
रेखा यांनी 1990 मध्ये बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केले होते. त्यावेळी रेखा आणि मुकेश यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. मात्र, रेखा आणि मुकेश यांच्या वैवाहिक आयुष्याला ग्रहण लागले. रेखा आणि मुकेश यांचे लग्न वर्षभर देखील टिकले नाही. 2 ऑक्टोबर 1990 रोजी मुकेश यांनी रेखाच्या दुपट्ट्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: