एक्स्प्लोर

Happy Birthday Genelia D’Souza : मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात, हिंदीच नव्हे तर साऊथ चित्रपटविश्वही गाजवणारी जिनिलिया डिसूजा!

Genelia D’Souza Birthday : बॉलिवूडची क्युट अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D’Souza) आज (5 ऑगस्ट) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे.

Genelia D’Souza Birthday : बॉलिवूडची क्युट अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D’Souza) आज (5 ऑगस्ट) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. जिनिलिया डिसूजा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात क्युट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला तिच्या गोड हास्यामुळे मॉडेलिंग विश्वात वाहवा मिळाली होती. फार कमी वेळात जिनिलिया डिसूजाने भारतातील अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. अभिनेत्रीचे सर्वच चित्रपट जवळपास हिट ठरले. जिनिलियाने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

जिनिलियाने तिच्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान मॉडेलिंगमध्ये करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी ती अवघ्या 15 वर्षांची होती. मॉडेलिंगदरम्यानच तिला बॉलिवूड चित्रपटाची ऑफरही आली. जिनिलियाने 2003मध्ये वयाच्या 21व्या वर्षी रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh) 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिने मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिली जाहिरात!

जिनिलिया डिसूजाला वयाच्या 15व्या वर्षी मॉडेलिंगची पहिली ऑफर मिळाली, ज्यामध्ये तिला पार्कर पेनच्या जाहिरातीत काम करायचे होते. या जाहिरातीत तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत पारकर पेनची जाहिरात करायची होती.  दरम्यान ती मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पहिला चित्रपट स्वीकारला. 2003मध्ये तिला ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पहिलाच हिंदी चित्रपट हिट झाल्यानंतर जिनिलियाला तमिळ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले.

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाने तू या जाने ना' या हिंदी चित्रपटाद्वारे जिनिलिया डिसूजाने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली. यानंतर त्याने 'चान्स पे डान्स', 'फोर्स', 'तेरे नाल लव हो गया', 'जय हो' सारख्या चित्रपटात तिने काम केले. 2018मध्ये जिनिलिया 'माऊली' या मराठी चित्रपटातून निर्मातीही बनली. 2006 मध्ये 'बोमारिल्लू' या तेलुगू चित्रपटासाठी तिने पहिला 'फिल्मफेअर अवॉर्ड' जिंकला. जिनिलियाची सर्वात खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री असण्यासोबतच ती राज्यस्तरीय खेळाडू आणि राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू देखील आहे.

रितेशसोबत जमली जोडी

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा यांची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. दोघांमध्ये अनेक गोष्टी शेअर होऊ लागल्या, अशा प्रकारे दोघांमधील बॉन्डिंग वाढतच गेले आणि काही काळानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 10 वर्षांच्या डेटिंगनंतर 2012मध्ये रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा यांनी लग्न केले. जिनिलिया आणि रितेश यांना रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत. रितेश आणि जिनिलिया यांची गणना बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी जोडप्यांमध्ये केली जाते.

हेही वाचा :

Genelia D'Souzaचा बॉसी अवतार; रितेश देशमुख सोबत दिसतेय खास!
Genelia D'Souza: जेनेलिया डिसूझा लवकरच दिसणार 'मिस्टर मम्मी' सिनेमात!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget