एक्स्प्लोर

Happy Birthday Chitrangada Singh : कॉलेजमधील ‘त्या’ घटनेने बदललं चित्रांगदा सिंहचं आयुष्य! वाचा अभिनेत्रीचा फिल्मी प्रवास...

Chitrangada Singh Birthday : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) आज (30 ऑगस्ट) तिचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे.

Chitrangada Singh Birthday : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) आज (30 ऑगस्ट) तिचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रांगदा सिंहचा जन्म जोधपूर, राजस्थान येथे झाला. चित्रांगदा सिंहचे वडील आर्मी ऑफिसर होते. तर, तिचा भाऊ दिग्विजय सिंह प्रसिद्ध गोल्फपटू आहे. चित्रांगदाने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. चित्रांगदाने कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे तिचे संपूर्ण आयुष्य पालटले होते.

अल्ताफ राजा यांच्या 'तुम तो ठहरे परदेसी' या अल्बममधून अभिनेत्री चित्रांगदाला मनोरंजन विश्वात लोकप्रियता मिळाली होती. तर, 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. प्रदीर्घ फिल्मी कारकीर्द असूनही चित्रांगदाला अभिनयात अपेक्षित प्रसिद्धी मिळवता आली नाही. त्यानंतर तिने चित्रपट निर्मितीत हात आजमावला. 'देसी बॉईज', 'इनकार' आणि 'ये साली जिंदगी' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

कॉलेजमधील ‘या’ घटनेने बदलले आयुष्य!

चित्रांगदाच्या मनोरंजन विश्वात येण्यामागे देखील एक किस्सा आहे. ती याचं श्रेय कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेला देते. या घटनेने तिचं आयुष्य बदलून टाकलं होतं. एका मुलाखतीत स्वतः चित्रांगदाने (Chitrangada Singh) हा किस्सा सांगितला होता. ती म्हणाली, ‘माझा मॉडेलिंगचा प्रवास कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी झालेल्या रॅगिंग सेशनने सुरू झाला. त्यावेळी मला उलटा ड्रेस परिधान करून, केसांना तेल लावून आणि पुस्तकांनी भरलेली बादली घेऊन रॅम्पवॉक प्रमाणे चालण्यास सांगितले गेले होते. हे माझे पहिले मॉडेलिंग ऑडिशन होते. साहजिकच मी यात खूप चांगली कामगिरी केली आणि नंतर कॉलेजच्या फॅशन टीमचा भाग झाले. इथूनच माझ्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात झाली.’

लग्न अन् घटस्फोट

चित्रांगदाने (Chitrangada Singh) 2001 मध्ये भारतीय गोल्फपटू ज्योती रंधवासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांना जोरावर नावाचा एक मुलगाही आहे. पण, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांच्या घटस्फोटानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रांगदाच्या चित्रपटांमध्ये काम करण्याच्या निर्णयामुळे तिच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला आणि या मतभेदाचे रूपांतर घटस्फोटात झाले. चित्रांगदाला एक मुलगाही आहे, ज्याची कस्टडी अभिनेत्रीला मिळाली आहे. चित्रांगदा तिचा मुलगा जोरावरसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती आणि चित्रांगदाने तिच्या मुलासोबत दिल्लीत राहावे, अशी ज्योती रंधवाची इच्छा होती. चित्रांगदाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते आणि दोघांनाही ते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यात खटके उडत होते, असेही बोलले गेले होते.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 30 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff First Reaction On Updates: थरारक हल्ल्यावर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांना म्हणाला, डाव्या बाजूने 3, समोरुन 2 गोळ्या आल्या, मी बेछूट गोळीबारानंतरही वाचलो कारण...
थरारक हल्ल्यावर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांना म्हणाला, डाव्या बाजूनं 3, समोरुन 2 गोळ्या आल्या, मी बेछूट गोळीबारानंतरही वाचलो कारण...
Sachin Pilgaonkar on Nana Patekar: 'आई मी नाना पाटेकर बोलतोय...'; नाना पाटेकरांनी सचिन पिळगावकरांच्या आईंना का केला होता फोन? सांगितला किस्सा
'आई मी नाना पाटेकर बोलतोय...'; नाना पाटेकरांनी सचिन पिळगावकरांच्या आईंना का केला होता फोन? सांगितला किस्सा
Tiger Shroff Case: 'जत्रेत गेला होता, 2 महिन्यांपूर्वीच त्याने घर सोडलं...'; टायगर श्रॉफ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
'जत्रेत गेला होता, 2 महिन्यांपूर्वीच त्याने घर सोडलं...'; टायगर श्रॉफ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
Ajinkya Deo on Maherchi Saadi: असंख्य बायकांना रडवणारा चित्रपट 'माहेरची साडी' रिमेक? गुजराती सिनेमाची स्टोरी, अजिंक्य देव यांचा मोठा खुलासा
असंख्य बायकांना रडवणारा चित्रपट 'माहेरची साडी' रिमेक? गुजराती सिनेमाची स्टोरी, अजिंक्य देव यांचा मोठा खुलासा

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Uday Samant on Gokul Election Result 2026: जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
Embed widget