Hanshraj Raghuwanshi: 'मेरा भोला है भंडारी' गाण्याचा गायक अडकला लग्नबंधनात; हंसराज रघुवंशीनं कोमल सकलानीसोबत बांधली लग्नगाठ, पाहा फोटो
Hanshraj Raghuwanshi: हंसराजने कोमल सकलानीसोबत लग्नगाठ बांधली आहे. कोमल आणि हंसराज यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
![Hanshraj Raghuwanshi: 'मेरा भोला है भंडारी' गाण्याचा गायक अडकला लग्नबंधनात; हंसराज रघुवंशीनं कोमल सकलानीसोबत बांधली लग्नगाठ, पाहा फोटो Hanshraj Raghuwanshi mera bhola hai bhandari fame singer got married see photo Hanshraj Raghuwanshi: 'मेरा भोला है भंडारी' गाण्याचा गायक अडकला लग्नबंधनात; हंसराज रघुवंशीनं कोमल सकलानीसोबत बांधली लग्नगाठ, पाहा फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/23/5805c6b1b61f21b1049be335fce523241698054204733259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hanshraj Raghuwanshi: प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशीला (Hanshraj Raghuwanshi) 'मेरा भोला है भंडारी' (Mera Bhola Hai Bhandari) या गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली. या गायकाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत. सध्या हंसराज रघुवंशी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हंसराज रघुवंशीचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला आहे. हंसराजने कोमल सकलानीसोबत लग्नगाठ बांधली आहे. कोमल आणि हंसराज यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हंसराज रघुवंशीने कोमल सकलानीसोबत हिमाचल प्रदेश येथील सरकाघाटमधील मंडी येथे सात फेरे घेतले. हंसराज आणि कोमल यांच्या लग्नसोहळ्याला त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.
हंसराज रघुवंशी आणि कोमल 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि मार्च 2023 मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली. एका मुलाखतीत हंसराजने सांगितले होते की, तो 2017 मध्ये कोमलला भेटला होता. कोमल त्याला खूप सपोर्ट करते आणि ती त्याची प्रेरणा देखील आहे. कोमल ही यूट्यूबर आहे.
View this post on Instagram
हंसराज आणि कोमलचा लूक
हंसराज आणि कोमल यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता. हंसराज रघुवंशीनं त्यांच्या लग्न सोहळ्यात गोल्डन शेरवानी आणि गोल्डन पगडी असा लूक केला होता. तर रेड लेहंगा आणि ग्रीन अँड व्हाईट स्टोन ज्वेलरी या कोमलच्या लग्नसोहळ्यातील ब्रायडल लूकनं देखील अनेकांचे लक्ष वेधले.
View this post on Instagram
'मेरा भोला है भंडारी' या हंसराज रघुवंशीच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच 'पल पल दिल के पास' या चित्रपटातील 'आधा भी ज्यादा' हे गाणं देखील हंसराज रघुवंशीनं गायलं आहे. हंसराजची पत्नी कोमलचे स्वत:चे युट्यब चॅनल आहेत. तसेच कोमल ही इन्स्टाग्रामवर देखील अॅक्टिव असते. तिला इन्स्टाग्रामवर 219K फॉलोवर्स आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)