मुंबई- लखनऊ येथील विविध भारतीमध्ये रेडिओ अनाउंन्सर म्हणून काम करून करिअरकची सुरूवात करणाऱ्या अभिनेत्री फारूख जाफर यांचे काल (15 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1981मध्ये प्रदर्शित झालेल्या  'उमराव जान' या चित्रपटामध्ये काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात रेखा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये फारूख यांनी रेखा यांच्या आईची भूमिका साकारली होती. 


'उमराव जान' चित्रपटानंतर तब्बल 23 वर्षांनंतर फारूख यांनी पुन्हा चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. स्वदेश, पीपली लाइव्ह, चक्रव्यूह, तनु वेड्स मनु आणि सुल्तान या चित्रपटांमध्ये फारूख जाफर यांनी काम केले. फारूख यांचा गुलाबो सिताबो हा अखेरचा चित्रपट होता. त्यांच्या या चित्रपटातमधील अभिनयाने सर्वांच लक्ष वेधले होते. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. 'गुलाबो सिताबो' या चित्रपटामध्ये फारूख जाफर यांनी फातिमा बेगम ही भूमिका साकारली. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना 28 मार्च 2021 रोजी  फिल्मफेअरच्या  सर्वश्रेष्ठ सह-अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले.  गुलाबो सिताबो हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या कथेला आणि कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. फारूख यांनी   'अनवर का अजब किस्सा' , 'अलीगढ़', 'पार्च्ड', 'सीक्रेट सुपरस्टार', 'फोटोग्राफ' या चित्रपटांमध्ये दखील महत्वपूर्ण भूमिका साकारली. 


Little Things Season 4 Review : आजच्या काळात लिव-इनचा झाला अंत, ध्रुव आणि काव्याचे प्रेम झाले सफल


वयाच्या 13 व्या वर्षी लग्न


अभिनेत्री फारूख जाफर यांचे लग्न वयाच्या 13 व्या वर्षी पत्रकार सैयद मोहम्मद जाफर झाले. लग्नानंतर फारुख यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी  विविध भारतीमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती. 


Sooryavanshi Release Date : 'सूर्यवंशी' चित्रपटाची प्रतिक्षा संपली, Akshay Kumar ने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती