Akshay Kumar in Gorkha : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय (Anand L Rai) हे नावाजलेले दिग्दर्शक करणार आहेत. अतरंगी रे (Atrangi Re) आणि रक्षाबंधन (Rakshabandhan) सिनेमाचे दिग्दर्शन केल्यानंतर आनंद एल राय यांनी आणखी एका चित्रपटासाठी साईन केलं आहे. या चित्रपटाचे नाव आहे गोरखा. 


'गोरखा' चित्रपट महान गुरखा नायक मेजर जनरल इयान कार्डोझोच्या जीवनावर आधारित आहे.  त्यांनी 1962, 1965 आणि 1971 सालात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 1971 सालात झालेल्या युद्धात मेजर कार्डोझो वेलिंग्टनमध्ये डिफेंस सर्विस स्टाफ महाविद्यालयात एक कोर्स करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या सैनिकांना युद्धाच्या मैदानात पाठवण्यात आले होते. मेजर कार्डोझोला 'कारतूस साहेब' नावाने ओळखले जात होते. 1971 साली झालेल्या युद्धात मेजर कार्डोझोला यांना पाय गमवावे लागले होते. 


चित्रपटाची माहिती देताना मेजर जनरल इयान कार्डोझो म्हणाले, "1971 साली झालेल्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने युद्धाची गोष्ट शेअर करताना मला अभिमान वाटतो आहे. हा चित्रपट भारतासाठी गर्वाची गोष्ट आहे. मी आनंद आणि अक्षयसोबत हा चित्रपट करतो आहे, याचा मला आनंद आहे". चित्रपटातील मेजर जनरल इयान कार्डोझोची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे. याआधी देखील अक्षयने अनेक देशभक्तीपर चित्रपट केलेले आहेत. अक्षयने चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करण्यासोबत चित्रपटाचे पोस्टरदेखील जाहीर केले आहे. याआधी अक्षयचे रुस्तम, बेबी, एयरलिफ्ट, बेलबॉटम, केसरी असे देशभक्तीपर चित्रपट केलेले आहेत.


अक्षयचा 'सूर्यवंशी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला


बॉलिवूड अभिनेता (Akshay Kumar) चा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'ची (Sooryavanshi) प्रतिक्षा संपली आहे. लवकरच सिनेमागृहात चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने (Rohit Shetty) केले आहे. चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त अजय देवगण (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंहने चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करत 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख जाहीख केली आहे. हा चित्रपट दिवाळीत 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 


या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे
येत्या आठवड्यात तापसी पन्नूचा 'रश्मि रॉकेट' झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर 'सरदार उधम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.  'रश्मि रॉकेट' येत्या 15 ऑक्टोबरला तर 16 ऑक्टोबरला 'सरदार उधम' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.