एक्स्प्लोर
गुल पनागच्या मुलाने पंतप्रधान मोदींचं मन जिंकलं, ट्वीट करुन आशीर्वाद दिला!
अभिनेत्री गुल पनागने नुकताच तिचा दीड वर्षांचा मुलगा निहालचा एक गोड व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निहाल मासिकाच्या मुखपृष्ठावरील पंतप्रधान मोदींचा फोटो पाहून त्यांना ओळखतो.
![गुल पनागच्या मुलाने पंतप्रधान मोदींचं मन जिंकलं, ट्वीट करुन आशीर्वाद दिला! Gul Panag tweets video of son Nihal identifying PM Modi in a magazine गुल पनागच्या मुलाने पंतप्रधान मोदींचं मन जिंकलं, ट्वीट करुन आशीर्वाद दिला!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/10/17125008/Gul-Panag-and-Son.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर लोकप्रिय आहेतच पण अतिशय अॅक्टिव्ह देखील आहेत. सोशल मीडियाद्वारे ते जनतेशी संपर्क आणि संवाद साधतात. सोशल मीडियावर ते सिनेसृष्टीतील लोकांशीची संपर्कात असतात. तसंच त्यांच्या संबंधित ट्वीटला रिप्लायही देतात.
अभिनेत्री गुल पनागने नुकताच तिचा दीड वर्षांचा मुलगा निहालचा एक गोड व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निहाल मासिकाच्या मुखपृष्ठावरील पंतप्रधान मोदींचा फोटो पाहून त्यांना ओळखतो. या व्हिडीओसोबत गुलने लिहिलं आहे की, तर आता निहाल मॅगझिन आणि वृत्तपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओळखू लागला आहे. बहुतेक वेळा तो आनंदाने त्यांच्या फोटोकडे इशारा करुन सांगतो. मी मोठ्या परिश्रमाने कॅमेऱ्यासमोर त्याच्याकडून हे करुन घेतलं आहे.
या व्हिडीओवर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. निहालचं कौतुक करताना हा व्हिडीओ आवडल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच निहालच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गुल पनागच्या या ट्वीटवर उत्तर देताना त्यांनी लिहिलं आहे की, "अत्यंत सुंदर, निहालला माझा आशीर्वाद. तो भविष्यात जे काही करेल, त्यासाठी शुभेच्छा. तुझ्या रुपात निहालला उत्तम गुरु आणि मार्गदर्शक मिळेल, यावर माझा विश्वास आहे."So Nihal now promptly identifies @narendramodi in magazines & newspapers. Gleefully pointing him out me - often first thing in the morning. I managed to make him do it 'for the camera'. @Openthemag pic.twitter.com/lQCLWqQOeZ
— Gul Panag (@GulPanag) October 16, 2019
गुल पनाग 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या बायपास रोडमध्ये झळकणार आहे. तर याआधी ती फॅमिली मॅन या वेबसीरिजमध्ये दिसली होती. तसंच गुल पनागने 2014 मध्ये आम आदमी पक्षाकडून चंदीगडमधून लोकसभा निवडणूल लढवली होती.Extremely adorable!
Do convey my blessings to young Nihal. Wishing him the very best, in whatever he seeks to do. I am also sure he will find an amazing mentor and guide in you, @GulPanag. https://t.co/CQN5hMPg7Z — Narendra Modi (@narendramodi) October 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सिंधुदुर्ग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)