एक्स्प्लोर
गुगलच्या सीईओंकडून श्रीदेवींना श्रद्धांजली
गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांनीही ट्वीट करुन श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी शोकाकुल आहे. श्रीदेवींच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांनीही ट्वीट करुन श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुंदर पिचाई यांनी म्हटलंय की, "सदमा सिनेमातील त्यांच्या अभियनाने मी त्यांचा चाहता बनलो. मला आजही आठवतंय, हा सिनेमा माझ्या कुटुंबीयांसोबत पाहिला होता. त्या (श्रीदेवी) आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी होत्या. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच इश्वरचरणी प्रार्थना."
दुसरीकडे श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीने देखील इंस्टाग्रामवर त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच आपल्या वाढदिवसापूर्वी चार दिवस आधी त्यांनी अतिशय हृदयस्पर्शी आवाहन केलं आहे. जान्हवी इंस्टाग्रामवर श्रीदेवींचे फोटो शेअर करुन म्हटलंय की, “वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते…तुमच्या आई-वडिलांवर नितांत प्रेम करा. त्यांना समजून घ्या आणि त्यांच्याबद्दल समर्पित भावना ठेवा. माझ्या आईला तुम्ही प्रेमपूर्वक लक्षात ठेवा. तिच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना करा.” “माझ्या आईच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेम हीच होती, जी ती माझे वडील बोनी कपूर यांच्यासोबत नेहमी शेअर करायची. तिचं प्रेम अमूल्य होतं. या दोघांच्या प्रेमाची तुलना जगात दुसऱ्या कशासोबतही होऊ शकत नाही. त्याचा आदर करा. त्यांच्या प्रेमाला कुणी गालबोल लावण्याचा प्रयत्न करेल, ही कल्पना करुनही खूप त्रास होतो. त्यांच्या प्रेमाचं पावित्र्य राखा. फक्त आईसाठीच नाही तर माझ्या बाबांसाठीही. मी आणि खुशीने आई गमावली आहे, पण माझ्या बाबांनी त्यांचं सर्वस्व गमावलं आहे.” “माझी आई एक गुणी अभिनेत्री, चांगली आई आणि आदर्श पत्नी तर होतीच, पण त्यापलिकडे ती उत्तम माणूस होती. तिने प्रत्येक भूमिका चोख वठवली. तिने इतरांना प्रेम दिलं आणि बदल्यात तिला प्रेम मिळत गेलं. द्वेष, तिरस्कार या गोष्टींचा तिच्यावर कधीही परिणाम झाला नाही.” “प्रेम हीच जगातील शाश्वत गोष्ट आहे. तेव्हा प्रेम करत राहा. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळेच आम्ही या कठीण प्रसंगात स्वत:ला सावरु शकलो.”Her performance in Sadma was one of my favorites and have special memories of watching Sridevi with my family. She was a pioneer and an inspiration to so many of us. So very sorry for your tragic loss and may she RIP
— Sundar Pichai (@sundarpichai) March 2, 2018
संबंधित बातम्या 'त्या' रात्री नेमकं काय घडलं होतं, बोनी कपूर यांचं पहिल्यांदा स्पष्टीकरण मुलीचं श्रीदेवीला हृदयस्पर्शी पत्र! …म्हणून श्रीदेवीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले! प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन लेकीची बॉलिवूडमधली ‘धडक’ पाहण्यापूर्वी ‘मॉम’ची एक्झिट ‘रुप की रानी’ श्रीदेवी यांची चित्रपट कारकीर्द बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण? श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार श्रीदेवींचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठी अहोरात्र मदत करणारा भारतीय उद्योजक गेल्या 22 वर्षांचा तिरस्कार विसरुन अर्जुन कपूर कुटुंबासोबत! श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालाकृष्णन श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांना दुबई पोलिसांकडून क्लीनचिट श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement