GodFather Box Office Collection: : सलमान खान अन् चिरंजीवी यांच्या 'गॉडफादर'ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
गॉडफादर (GodFather) या चित्रपटानं पहिल्या दिवशी केलेल्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात...
GodFather Box Office Collection: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा 'गॉडफादर' (Godfather) हा चित्रपट काल (5 ऑक्टोबर) प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 'पोन्नियिन सेलवन: 1'आणि 'विक्रम वेधा' या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चिरंजीवी (Chiranjeevi) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या गॉडफादर (GodFather) या चित्रपटानं पहिल्या दिवशी केलेल्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात...
रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार गॉडफादर या चित्रपटानं जगभरात 38 कोटींची कमाई केली. 'गॉडफादर' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या चित्रपटात चिरंजीवी आणि सलमान खान यांच्यासोबतच अभिनेत्री नयनतारानं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. मोहनलाल स्टारर मल्याळम ब्लॉकबस्टर 'लुसिफर' या चित्रपटाचा हा रिमेक आहे.
ट्रेंडिंग
हा मल्याळम ब्लॉकबस्टर 'लुसिफर' चा अधिकृत रिमेक आहे, ज्यात मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन, विवेक ओबेरॉय, मंजू वॉरियर आणि टोविनो थॉमस यांच्या प्रमुख भूमिका साकारली. याचित्रपटाचे दिग्दर्शन पृथ्वीराज सुकुमारन यांनी केले होते. 'राम चरणची कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी आणि आरबी चौधरी यांच्या सुपर गुड फिल्म्सने गॉडफादर' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 100 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, असं म्हटलं जात आहे.
सलमानचे आगामी चित्रपट
‘गॉडफादर’शिवाय सलमान खान ‘पठाण’ या चित्रपटामध्ये देखील कॅमिओ करणार आहे. ‘टायगर 3’, 'किसी का भाई किसी की जान' हे त्याचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: