Godfather Teaser Out : सध्या अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. चिरंजीवीचा (Chiranjeevi) 'गॉडफादर' (Godfather) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'गॉडफादर' हा सिनेमा 'लूसिफर' या ब्लॉकबस्टर मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे.
'गॉडफादर'मध्ये झळकणार चिरंजीवी आणि भाईजानची जोडी
'गॉडफादर' या सिनेमात चिरंजीवी आणि सलमान खानची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'गॉडफादर'चा दिमाखदार टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'गॉडफादर' हा भव्य दिव्य सिनेमा असून या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका अनुभवायला मिळेल याचा ट्रेलरवरुन अंदाज येतो.
'गॉडफादर'च्या माध्यमातून भाईजान करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण
'गॉडफादर' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे भाईजानचे चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गॉडफादर हा सिनेमा मल्याळम सुपरहिट सिनेमा लुसिफरचा रिमेक आहे, ज्यामध्ये पृथ्वीराज सुकुमारन दिसले होते. सलमान आणि चिरंजीवीशिवाय नयनतारा, सत्यदेव कांचन आणि जय प्रकाश हे कलाकारही या सिनेमात दिसणार आहेत.
'गॉडफादर' सिनेमाच्या टीझरमध्ये सलमानचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. काही स्टंट करताना तो दिसत आहे. 'गॉडफादर'चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे 'गॉडफादर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे.
संबंधित बातम्या