'संगीत संन्यस्त खड्ग' रंगभूमीवर

Continues below advertisement

Sangeet Sanyasta Khadga Poster

Continues below advertisement
1/3
सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून नुकतंच या नाटकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे.
2/3
‘अहिंसेचे तत्वज्ञान’ आणि ‘राष्ट्रहित’ यातील द्वंद्व दर्शवणारे हे नाटक काळाला अनुरूप असून 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाचा ८ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग होईल. हा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी साडे सहा वाजता होणार आहे.
3/3
'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाची निर्मिती सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र माधव साठे यांनी केली असून सहनिर्माते नाट्यसंपदा कला मंचाचे अनंत पणशीकर आहेत.तर,मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार व दिग्दर्शक ऋषीकेश जोशी यांनी नाटकाची रंगावृत्ती आणि दिग्दर्शन केले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी सांभाळली आहे. सोबतच ओमप्रकाश शिंदे आणि केतकी चैतन्य हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Sponsored Links by Taboola