Kangana Ranaut: PVR Inox चे 50 थिएटर होणार बंद, कंगनानं दिली प्रतिक्रिया, म्हणाली, 'चित्रपटगृहांची गरज...'
PVR या कंपनीकडून पुढील सहा महिन्यात 50 सिनेमा स्क्रिन्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) प्रतिक्रिया दिली आहे.
PVR Inox : पीव्हीआर-आयनॉक्स मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटरला (PVR Inox Multiplex chain) मार्च अखेरच्या तिमाहीत 333 कोटींचा तोटा झाल्यानंतर आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून पुढील सहा महिन्यात 50 सिनेमा स्क्रिन्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं एका ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेड एक्सपर्ट गिरीश जौहर यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटला कंगनानं रिप्लाय दिला आहे. गिरीश जौहर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'अहवालानुसार, 2023 या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत PVR ला 333 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तर गेल्या वर्षी 170 कोटींचा तोटा झाला आहे. आता PVR पुढील 6 महिन्यांत 50 चित्रपटगृहे बंद करण्याचा विचार करत आहे.'
कंगनाचा रिप्लाय
गिरीश जौहर यांच्या ट्वीटला कंगनानं रिप्लाय दिला, 'आपल्या देशात आणखी चित्रपटगृहांची गरज आहे. आम्हाला अधिक स्क्रीन्सची गरज आहे, चित्रपटगृह बंद होणं हे चित्रपट उद्योगासाठी चांगले नाही. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे खूप महाग झाले आहे, मित्र/कुटुंबासोबत चित्रपट बघायला जाणे म्हणजे मध्यमवर्गीय व्यक्तीच्या पगारामधील मोठी रक्कम खर्च होण्यासारखं आहे. यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे.'
We need more theatres in the country… we need more screens, this is not good for the film industry… having said that watching films in the multiplexes have become very expensive, going with friends /family means a significant part of a middle class person’s salary … something… https://t.co/HQsjen7DTq
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 15, 2023
कंगनाचे आगामी चित्रपट
फॅशन, तनु वेड्स मनु, क्विन तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. कंगनाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. तसेच कंगना ही पी वासूजी यांच्या तमिळ चित्रपटात देखील काम करणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पुढच्या सहा महिन्यात PVR Inox चे 50 थिएटर बंद होणार, 333 कोटींचा तोटा झाल्यानंतर कंपनीचा निर्णय