Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ते फिल्टर पाड्याचा बच्चन; गौरव मोरेचा फिल्मी प्रवास...
Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर गौरव मोरे घराघरांत पोहोचला आहे.
![Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ते फिल्टर पाड्याचा बच्चन; गौरव मोरेचा फिल्मी प्रवास... Gaurav More Marathi Actor Maharashtrachi Hasyajatra Star Gaurav More Actor Biography Profile Story Filter Pada Powai Filter Padyacha Bachchan Comedian Entertainment Latest Update Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ते फिल्टर पाड्याचा बच्चन; गौरव मोरेचा फिल्मी प्रवास...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/08/4aec6326563e6d1acd37cb4618ecd07b1699427508219254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) घराघरांत पोहोचला आहे. 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणून तो ओळखला जातो.
गौरव मोरेला 'फिल्टर पाड्याचा बच्चन' का म्हणतात?
गौरव मोरेने मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्याला 'फिल्टर पाड्याचा बच्चन' का म्हणतात याचा खुलासा केला आहे. गौरव म्हणालेला,"फिल्टर पाडा ही आरे कॉलनीतील एक जागा आहे. फिल्टर पाड्याच्या सभोवताली जंगल आहे. तसेच जंगलामध्ये छोटी वस्तीदेखील आहे.
आरे कॉलनीतील या भागात गौरव लहानाचा मोठा झाला आहे. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे गौरवचे आवडते अभिनेते आहेत. बिग बींच्या 'हम' सिनेमातील स्टाईल मारायला गौरवला आवडते. गौरव मोरे आज यशस्वी अभिनेता असला तरी त्याने एकांकिका स्पर्धांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. एकांकिकेत अनेकदा त्याने बिग बींसारखी एन्ट्री घेतली आहे. गौरवची ही स्टाईल हास्यजत्रेतील मंडळींनादेखील प्रचंड आवडली. त्यामुळे हास्यजत्रेतील स्कीटमध्येही त्याला याच स्टाईलमध्ये एन्ट्री मारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर गौरव मोरे 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणून घराघरांत लोकप्रिय झाला.
View this post on Instagram
गौरव मोरे हा प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे. मराठी नाटक, सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करण्यासोबत हिंदी सिनेमांतही गौरवच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. हास्यजत्रेच्या स्कीटमध्ये नेहमीच गौरवचा अपमान होत असतो. पण विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर गौरव मोरे प्रेक्षकांना खळखळून हसवतो. सर्वसामान्य परिस्थितीत गौरवचं बालपण गेलं आहे.
गौरवच्या 'या' शैलीचा मोठा चाहतावर्ग
गौरव मोरेने महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावलं आहे. विनोदाच्या टायमिंगची, मराठी शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारुन खुमासदार विनोद करण्याच्या गौरव या शैलीचा मोठा चाहतावर्ग आहे. गौरव मोरेला कॉलेजमध्ये असताना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. गौरव मोरेचा 'बॉईज 4' (Boyz 4) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. तसेच त्याचा 'लंडन मिसळ' हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या
Vanita Kharat : न्यूड फोटोशूट ते 'कबीर सिंह'मधील मोलकरीण; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं फिल्मी करिअर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)