Rajkumar Santoshi: ‘गांधी गोडसे एक युद्ध'चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र, सुरक्षेची केली मागणी
राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांनी मुंबईचे सीपी देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
Rajkumar Santoshi: गेल्या काही दिवसांपासून ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेक लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत तर काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे सीपी देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे.
राजकुमार संतोषी यांनी मुंबईतील विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहून कुटुंबासाठी आणि स्वत:साठी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.
Rajkumar Santoshi, director of the film 'Gandhi Godse - Ek Yudh' writes to Mumbai's Special CP Deven Bharti seeking additional security for himself and his family after a press conference held by him and his team was interrupted by a group of protestors in Mumbai pic.twitter.com/oUhpO4bjbN
— ANI (@ANI) January 23, 2023
‘गांधी गोडसे एक युद्ध’चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि निर्माते ललितकुमार श्याम टेकचंदानी यांनी मुंबई पोलिसांचे सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांची भेट घेतली आणि दोघांनी चौधरी यांना निवेदन दिले. सततच्या धमक्यांमुळे आपल्या जीवाला धोका आहे, असं राजकुमार संतोषी यांनी सांगितलं. गरजेनुसार कारवाई केली जाईल, असे चौधरी यांनी एबीपी न्यूजला सांगितले.
राजकुमार संतोषी यांच्या 'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटाचे स्क्रीनिंग काही दिवसांपूर्वी पार पडले. अंधेरी परिसरातील एका चित्रपटगृहात चित्रपटाचे काही फुटेज आणि संवाद दाखवण्यात आले होते. त्या दरम्यान काही लोकांनी या चित्रपटाचा निषेध केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
2 जानेवारी रोजी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा 'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला. या चित्रपटात चिन्मय मांडलेकरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधून राजकुमार संतोषी यांची मुलगी तनीषा संतोषीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: