Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत.. मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 30 Jul 2023 12:48 PM
Baipan Bhaari Deva : ब्लॉकबस्टर 'बाईपण भारी देवा'! 31 दिवसांत पार केला 70 कोटींचा टप्पा

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. देशासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवत आहे. 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आता 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चाहते म्हणाले,"ओंकार भोजनेला परत आणा"

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पण आता या कार्यक्रमात ओंकार भोजनेला परत आणा, अशी मागणी चाहते करत आहेत. 





Marathi Drama : अन् मराठी नाट्यसृष्टी बहरली! ऑगस्टमध्ये नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

Upcoming Marathi Drama : मराठी मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. एकीकडे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे (Marathi Movies) प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. बॉक्स ऑफिसवर (Box Office) हे सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान नवीकोरी नाटकंदेखील (Upcoming Marathi Drama) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.  'जर तरची गोष्ट', 'ब्रँड अॅम्बॅसेडर', 'किरकोळ नवरे', 'चाणक्य', 'मी नथुराम गोडसे बोलतोय' ही नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 


Marathi Drama : अन् मराठी नाट्यसृष्टी बहरली! ऑगस्टमध्ये नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

Sanjay Dutt : 'Leo' सिनेमातील संजय दत्तचा फर्स्ट लूक आऊट!

Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याने नुकताच 64 वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्याच्या आगामी 'लियो' (Leo) या सिनेमातील फर्स्ट लूक दिग्दर्शक लोकेश कनगराज (Lokesh Kanagraj) यांनी आऊट केला आहे. आता संजू बाबाच्या 'लियो' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.





Rajinikanth : "दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक"; रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत

Rajinikanth : जगभरात लोकप्रिय असलेल्या 'थलायवा' रजनीकांत (Rajinikanth) सध्या चर्चेत आहेत. नुकतेच चेन्नईमध्ये त्यांच्या आगामी 'जेलर' (Jailer) या सिनेमाच्या ऑडिओ लॉन्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. दारूच्या व्यसनाबद्दलही त्यांनी भाष्य केलं. दारू पिणं ही माझी चूक असं वक्तव्य रजनीकांत यांनी केलं आहे. 


Rajinikanth : "दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक"; रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sushmita Sen : "Taali बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी"; सुष्मिता सेनच्या 'ताली'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट


Sushmita Sen Taali teaser Out : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) ओटीटी विश्वात अधिराज्य गाजवलं आहे. सुष्मिताच्या 'आर्या' या वेबसिरीजला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आता अभिनेत्रीची आगामी 'ताली' (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता तृतीयपंथी गौरी सावंतच्या (Gauri Sawant) भूमिकेत दिसणार आहे.  'ताली'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट झाला आहे. 'ताली' ही वेबसीरिज येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तृतीयपंथ्यांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज असणार आहे. गौरी सावंतच्या भूमिकेत सुष्मिताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


Ashok Saraf : कर्तृत्वानुसार प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करता येतं, तिथे स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो : अशोक सराफ


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले, "कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांना एक स्त्री म्हणून नेहमी सॉफ्ट कॉर्नर दिला जातो आणि त्यामुळे पुरुषांना कुठे व्यक्त होता येत नाही... ते सगळं सहन करत राहतात हे चुकीचं आहे. कर्तृत्वानुसार प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करता येतं. स्त्री असो वा पुरुष कोणाला संधी मिळाली नाही, असं कधी होत नाही. कर्तृत्वानुसार प्रत्येकाला काम मिळत राहतं". 


Movie Piracy: चित्रपटाची पायरसी केल्यास आता चित्रपट निर्मिती खर्चाच्या पाच टक्के दंड आणि तीन वर्षांची शिक्षा


Movie Piracy: एखादा नवीन चित्रपट आला की तो लगेचच तमिळ रॉकर्ससह योमूव्हीज आणि अन्य वेबसाईटवर अपलोड केला जातो. फुकटात आणि घरात चित्रपट पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात जात नाहीत. त्यामुळे निर्माता, वितरकांचे प्रचंड नुकसान होते. पायरसीमुळे चित्रपट उद्योगाला दरवर्षी 20 हजार कोटींचा फटका बसतो. पायरसी रोखण्यासाठी चित्रपट निर्माते केंद्र सरकारच्या मागे लागले होते. केंद्र सरकारने आता पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली असून राज्यसभेत ‘सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा,2023 मंजूर करण्यात आला आहे. सुधारित कायद्यानुसार आता जे चित्रपटाची पायरेटेड कॉपी तयार करतील, त्यांना चित्रपट निर्मितीच्या खर्चापैकी पाच टक्के दंड आणि तीन वर्षांचा कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.