Entertainment News Live Updates 5 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 05 Nov 2022 06:07 PM
Akola: अकोल्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाला सुरूवात; अरविंद जगताप अध्यक्षपदी

Akola: अकोल्यात (Akola) आजपासून दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाला सुरूवात झालीये. 'विदर्भ साहित्य संघा'च्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अकोला शाखेच्या वतीने हे आयोजन करण्यात आलंये. अकोल्यातील पातूर मार्गावरील प्रभात किड्स शाळेतील स्वर्गीय बाजीराव पाटील साहित्य नगरीत हे संमेलन होतंय. सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक अरविंद जगताप हे साहित्य संमोलनाच्या अध्यक्षपदी आहेत. दोन दिवस परिसंवाद, कवीकट्टा, वर्हाडी कट्टा, गझलकट्टा, आणि कवीसंमेलन अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. 

Godavari Movie: 'नदीसाठी, नदीकाठी!'; गोदावरी चित्रपटाच्या टीमनं केली ‘गोदावरी’ नदीची आरती

Godavari Movie: राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' (Godavari) चित्रपट आता आपल्या मायदेशी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. आता चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावत चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी संपूर्ण टीमच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन करण्यात आले. तर ‘गोदावरी’च्या टीमने पंचवटी येथे ‘गोदावरी’ नदीची आरतीही केली. 



Prashant Damle : ‘बुकिंगचा सम्राट’ प्रशांत दामले लवकरच पार करणार 12,500 प्रयोगांचा टप्पा

Prashant Damle : मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ अर्थात प्रशांत दामले (Prashant Damle) लवकरच 12,500 प्रयोगांचा टप्पा पार करणार आहेत. दामलेंचा रंगभूमीवरील प्रवास बेस्टमधून सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने एबीपी माझाच्या '12 हजार 500 प्रयोगांचा बेस्ट प्रवास' या कार्यक्रमाच्या माध्यमातून दामलेंनी बेस्टच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 


Adah Sharma: 'केरळमधील 32000 मुलींची कथा'; 'The Kerala Story' चा टीझर रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात

The Kerala Story: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्माच्या (Adah Sharma) 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. अदानं या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमधील अदाच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचे कथानक हे केरळमधील काही मुलींच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. 


पाहा टीझर 





De Dhakka 2 : मराठी कुटुंबाची कमाल, लंडनमध्ये होणार धमाल; 'दे धक्का 2'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर

De Dhakka 2 : 'दे धक्का' हा सिनेमा 2008 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी आजही आवडीने प्रेक्षक हा सिनेमा पाहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाने म्हणजेच 'दे धक्का 2' (De Dhakka 2) या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर होणार आहे. 'दे धक्का 2' हा सिनेमा झी टॉकीजवर सिनेरसिकांना दुपारी 12 आणि संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळणार आहे.

R Madhavan : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार होता आर.माधवन

R Madhavan On Vedat Marathe Veer Daudle Saat : प्रतापराव आणि त्यांच्या शिलेदारांचाअतुलनीय पराक्रम दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. या सिनेमात सुपस्टार अक्षय कुमार  छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या भूमिकेसाठी आर.माधवननेदेखील लूक टेस्ट दिली होती. 





Virat Kohli Birthday: विराटच्या वाढदिवासानिमित्त अनुष्काची खास पोस्ट; अतरंगी फोटो शेअर करत म्हणाली...

Virat Kohli Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आज 34 वर्षाचा झालाय.  विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली येथे झाला. विराटच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. आता नुकतीच विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्कानं विराटचे काही अतरंगी फोटो शेअर केले आहेत.



Bhagyashree Husband Surgery: 'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीवर पार पडली शस्त्रक्रिया; पोस्ट शेअर म्हणाली, 'चार तास..'

Bhagyashree Husband Surgery: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) 'मैने प्यार किया (Maine Pyar Kiya) या चित्रपटातून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. भाग्यश्रीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून भाग्यश्रीनं तिच्या पतीवर म्हणजेच हिमालय दसानी (Himalaya Dasani) यांच्यावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेबाबत सांगितलं. तिनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



Douglas Mcgrath : ऑस्कर नामांकित लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते डग्लस मॅकग्रा यांचे निधन

Douglas Mcgrath : ऑस्कर (Oscar) नामांकित लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते डग्लस मॅकग्रा (Douglas Mcgrath) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'एवरीथिंग इज फाइन' या त्यांच्या निर्मितीसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. 'एवरीथिंग इज फाइन' या संस्थेच्या न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

Priyanka Chopra : माझ्या करिअरच्या सुरुवातीला महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जायची : प्रियांका चोप्रा

Priyanka Chopra : प्रियांका म्हणाली,"माझ्या करिअरच्या सुरुवातीला महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जायची. सिनेमाचं शूटिंग कुठे होणार? सिनेमात कोणते कलाकार असतील यासर्व गोष्टी पुरुष ठरवत असे. पण आता हे चित्र बदलत आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळायलाच हवेत". 





Marathi Rangbhumi Din 2022 : 'एका लग्नाची पुढची गोष्ट' ते 'चारचौघी'; मराठी रंगभूमी दिनी नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी

Marathi Rangbhumi Din 2022 : नाट्यवर्तुळात 'मराठी रंगभूमी दिन' (Marathi Rangbhumi Din) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्यावर्षी हा दिवस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिसऱ्या घंटेविनाच साजरा झाला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रंगकर्मींनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त 'एका लग्नाची पुढची गोष्ट' ते 'चारचौघी' अशा अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत. 

Amber Heard : इलॉन मस्कच्या येण्याने एम्बर हर्डचा ट्विटरला रामराम

Amber Heard : इलॉन मस्क यांनी (Elon Musk) ट्विटर विकत घेतलं असून ते आता ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत. मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकाल्यानंतर त्यांनी अनेक बदल केले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहेत. अशातच आता इलॉन यांची एक्स गर्लफ्रेंड अर्थात हॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्डने (Amber Heard) तिचं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं आहे. 

Athiya Shetty Birthday : अथिया शेट्टीचा आज 29 वा वाढदिवस

Athiya Shetty Birthday : बॉलिवूडचा सुपरस्टार सुनील शेट्टीची (Suniel Shetty) लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नानाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. आज अथिया तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Prashant Damle : मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ प्रशांत दामलेंचा विक्रमी प्रयोग


मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ अशी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची ओळख आहे. गेल्या तीन दशकांत मोरू, माधव, मन्या, केशव, डॉ. पुंडलिक, बहरूपी, राजा, फाल्गुनराव अशा अनेक भूमिकांच्या माध्यमातून प्रशांत दामले प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच प्रशांत दामलेंनी 12,500 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. 


चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले बप्पी लाहिरींचे गाणे


चीनमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चीनमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे लोकांची उपासमार होता आहेत. ही भयानक परिस्थीती दाखवण्यासाठी चीन मध्ये लोक हातात रिकामी भांडी घेऊन सरकारचा निषेध नोंदवत आहेत. यावेळी हे लोक चीनच्या भाषेत 'जी मी, जी मी' म्हणजे 'मला तांदूळ दे, मला तांदूळ दे' असे म्हणत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यामुळे चीनमध्ये बप्पी लाहिरी यांच्या 'जिम्मी जिमी' गाण्याने धुमाकूळ गातला आहे. 


19 वर्षाच्या अब्दुवर फिदा जान्हवी कपूर


बिग बॉसचा खेळ हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सध्या सुरु असलेला बिग बॉस सीझन 16 (Big Boss 16) हा देखील प्रेक्षकांना चांगलाच आवडू लागला आहे. दिवसेंदिवस या शोची रंगत आणखीनच वाढतेय. यामध्येच आता शोच्या नुकत्याच दाखविण्यात आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) बिग बॉसच्या घरात गेस्ट म्हणून एन्ट्री करणार आहे. या एपिसोडमध्ये जान्हवी कपूर चक्क 3 फूट उंचीच्या अब्दु रोजिकबरोबर (Abdu Rozik) फ्लर्ट करताना दिसणार आहे. जान्हवीला अब्दु इतका आवडला आहे की तिने चक्क आपला फोन नंबरही अब्दुला शेअर केला आहे. 


'खाकी द बिहार चॅप्टर'सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज


'मिर्झापूर' (Mirzapur) या धमाकेदार सीरिजनंतर आता आणखी एक यूपी-बिहारवर आधारित सीरिज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्सची आगामी क्राईमवर आधारित वेब सिरीज 'खाकी-द बिहार चॅप्टर'चा (Khakee The Bihar Chapter) ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये करण टॅकर आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, रवी किशन, आशुतोष राणा देखील दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.