Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi In Kolhapur) यांची सभा पार पडणार आहे. उद्या (16 नोव्हेंबर)  प्रियांका गांधी यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा कोल्हापूर शहरातीत गांधी मैदानामध्ये होत आहे. दुपारी एक वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांच्या या सभेसाठी जिल्हा काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी काल प्रियांका गांधी यांच्या दौऱ्यासोबत माहिती दिली आणि या दौऱ्याला प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याच्या आवाहन सुद्धा केलं.


प्रियांका गांधी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये


दरम्यान, प्रियांका गांधी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत असल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये सुद्धा आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहेत. यापूर्वी काँग्रेस घराण्यातील इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांचा करवीर नगरीमध्ये राजकीय सभाच्या निमित्ताने दौरा झाला असला, तरी प्रियांका गांधी यांचा हा पहिलाच कोल्हापूर दौरा होत असल्याने या दौऱ्याची उत्सुकताच आणली वाढली आहे. प्रियांका गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. प्रियांका गांधी यांची सभा यशस्वी होण्यासाठी जिल्हा काँग्रेसकडून कंबर कसण्यात आली आहे. 






कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर आणि लागून असलेल्या करवीर मतदारसंघांचा विचार करून कोल्हापूरमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये पाच जागा आल्या आहेत. शिरोळ आणि हातकणंगलेमध्येही काँग्रेसचा उमेदवार आहे.  


राहुल गांधी एक महिन्यांपूर्वी कोल्हापुरात 


दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्याच हस्ते बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. त्यानंतर संविधान संमेलनाला सुद्धा त्यांनी संबोधित केलं होतं. त्यामुळे अवघ्या 40 दिवसांमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा कोल्हापूर दौरा होत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान सभा यशस्वी होण्यासाठी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या