Entertainment News Live Updates 27 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Aug 2022 05:05 PM
Liger : 'लायगर'मधील डायलॉगमुळे अनन्या पांडे ट्रोल; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

Nia Sharma : निया शर्मानं शेअर केला भन्नाट डान्सचा व्हिडीओ

Farhan Akhtar : फरहाननं शिबानीला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; शेअर केली पोस्ट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमची नागपूर एअरपोर्टवर 'ग्रेट-भेट'

महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला पाहिलं जातं. हास्यजत्रेतील समीर चौगुले, प्रिथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे दमदार कलाकार आता नागपूरकरांच्या भेटीस आले आहेत. नागपूर दौऱ्यानिमित्त विमानाने प्रवास करताना त्यांची भेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झाली. देवेंद्रजी आणि आपले हास्यजत्रेचे कलाकार एकाच विमानाने प्रवास करत होते. विशेष म्हणजे देवेंद्रजी ही प्रवासादरम्यान हास्यजत्रा कार्यक्रमाचे मागील भाग पाहत होते. हा निव्वळ योगायोग म्हणावा. कलाकारांना भेटल्यावर त्यांनी कलाकारांचे, कार्यक्रमाचे आणि सोनी मराठी वाहिनीचे कौतुक केले. त्यांच्या बिझी शेड्युलमध्ये ही ते प्रवासा दरम्यान वा फावल्या वेळेत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहणे पसंत करतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारांची नागपूर एअरपोर्टवरील ही ग्रेट भेट कायम लक्षणीय असेल.


Kalsutra : जिओ स्टुडिओजच्या थरारक आणि ॲक्शन पॅक वेब शो ‘कालसूत्र’ची घोषणा; सुबोध भावे, सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत

Kalsutra : मराठी मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज असणाऱ्या जिओ स्टुडिओजने गेल्या काही दिवसात अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची घोषणा केली. आता जिओ स्टुडिओने एका नव्या वेब-शोची घोषणा केली आहे. सलील देसाई यांच्या ‘मर्डर माईलस्टोन’ कादंबरीवर आधारीत ‘कालसूत्र’ (Kalsutra) हा रोमांचकारी थरारक वेब-शो लवकरच आपल्या भेटीला येणारं आहे.



Liger box office collection day 2 : लायगरच्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन

लायगरचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
लायगर या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 33.12 कोटींची कमाई केली. तर पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत जवळपास 50 टक्के घसरण झाली आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 16 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. 

The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' च्या नव्या सिझनचा प्रोमो व्हायरल; 10 सप्टेंबरपासून शो येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मलायका आणि अर्जुनचा रोमँटिक अंदाज; डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Neha Dhupia : नेहा धूपियाचा 42 वा वाढदिवस; जाणून घ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीबद्दल...

Neha Dhupia Birthday : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धूपियाचा (Neha Dhupia) आज 42 वा वाढदिवस आहे. नेहाचा जन्म 27  ऑगस्ट 1980 रोजी झाला. नेहा ही माजी 'मिस इंडिया' आहे. 2002 मध्ये नेहानं 'मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकली होती. नेहा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नेहानं 1999 मधील राजधानी या  छोट्या पडद्यावरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.   


वाचा सविस्तर बातम्या

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


तब्बल 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर, कॉमेडियनच्या सेक्रेटरीने दिली हेल्थ अपडेट


कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना तब्बल 15 दिवसांनी आज (25 ऑगस्ट) शुद्ध आली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांचे सेक्रेटरी गर्वित नारंग यांनी माहिती देताना सांगितले आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना छातीत दुखू लागल्याने आणि बेशुद्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


टिकटॉकस्टार सोनाली फोगटचा मृत्यू नसून हत्याच, कुटुंबियांचा आरोप; गोवा पोलिसांनी दाखल केला गुन्हा


टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat)  मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने पोलिसात तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना गोव्यतील सेंट अँथोनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.


'मिस नेशन 2022'मध्ये नागपूरच्या सिद्धी, मुस्कानचा जलवा


अलिकडे फॅशन क्षेत्रात करिअर घडविण्याकडे तरुणींचा कल वाढला आहे. यामध्येच विदर्भातील तरुणींना या क्षेत्रातील प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होऊन या क्षेत्रात करिअरच्या नव्या दिशा मिळाव्या या उद्देशाने 'मिस नेशन 2022'या (Miss Nation 2022) सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरातील 8 राज्यातून सुमारे 65 तरुणींनी सहभाग नोंदविला होता. सहभागींपैकी टॉप 14 मुलींची निवड अंतिम फेरीसाठी (final round) करण्यात आली. यांची अंतिम फेरी नुकतीच नागपुरात (Nagpur) झाली. गुजरातची परेवी ब्राम्हभट्ट (Parevi Brahmbhatt) 'मिस नेशन 2022' ठरली तर नागपूर शहरातील दोन्ही सौंदर्यवतींनी द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावले. सिद्धी मनिष त्रिवेदी (Siddhi Trivedi) ही फर्स्ट रनरअप ठरली तर मुस्कान शर्माने (Muskan Sharma) सेकंड रनरअपचा टायटल मिळवला.


‘बनी’च्या शिरपेचात मनाचा तुरा, अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडले स्क्रिनिंग!


जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित - दिग्दर्शित 'बनी' (Bunny) या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 'बनी'चे स्क्रिनिंग येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी, सायंकाळी टेम्पल लाइव्ह येथे होणार आहे. तीस देशांतील शेकडो चित्रपटांच्या प्रवेशिका या महोत्सवासाठी विचारधीन होत्या. त्यातून 137 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय भाषेतील 'गुठली लड्डू' आणि मराठीतील 'बनी' या दोन भारतीय चित्रपटांची निवड झाली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.