Oscar Nominations 2023 Live : थोड्याच वेळात सुरू होणार 'ऑस्कर नामांकन 2023'; सर्व अपडेट्स एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 24 Jan 2023 07:19 PM
Oscar Nominations 2023 : ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला र्वोत्कृष्ट संगीत (ओरिजनल स्कोअर) नामांकन जाहीर!

Oscar Nominations 2023 : 'ऑस्कर नामांकन 2023' मध्ये संगीत (ओरिजनल स्कोअर) या कॅटेगरीत राजामौलींच्या 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट संगीत (ओरिजनल स्कोअर) या कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे. 

Oscar Nominations 2023 Live : 'ऑस्कर नामांकन 2023'ला सुरुवात

Oscar Nominations 2023 Live : 'ऑस्कर नामांकन 2023'ला दणक्यात सुरुवात झाली आहे. 


 

ऑस्कर नामांकनाच्या आधी आरआरआरच्या निर्मात्यांनी केलं ट्वीट

'आरआरआर' हा सिनेमा ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत असून नामांकनाच्या थोड्यावेळ आधी निर्मात्यांनी फिंगर क्रॉस केलाला इमोजी शेअर केला आहे. 





Pathaan Box Office : शाहरुखच्या 'पठाण'ची हवा; कोरोनात बंद पडलेले 25 सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा सुरू होणार!

Shah Rukh Khan Pathaan Box Office : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. किंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शाहरुखची आणि त्याच्या बहुचर्चित सिनेमाची लोकप्रियता लक्षात घेत बंद पडलेले सिंगल स्क्रीन थिएटर्स (Single Screen) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला आहे. 

Rishab Shetty Kantara: कांताराची सेंच्युरी; थिएटरमध्ये पूर्ण केले 100 दिवस, निर्मात्यांची खास पोस्ट

Rishab Shetty Kantara:  कांतारा (Kantara) हा चित्रपट 2022 सालातील सर्वात चर्चेत असणारा चित्रपट आहे.  या चित्रपटाच्या कथानकाचं तसेच चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं थिएटरमध्ये 100 दिवस पूर्ण केले आहेत. गेली 100 दिवस हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवण्यात येत आहे. या चित्रपटानं 100 दिवस पूर्ण केल्यानं आता कांताराच्या मेकर्सनं सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. 












 








 











Bholaa Movie Teaser: 'एक चट्टान और सौ शैतान...'; अंगावर शहारे आणणारा अजयच्या 'भोला' चा टीझर रिलीज

Bholaa Movie Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या भोला (Bholaa) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. भोला चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 





Jhimma 2 : दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'झिम्मा 2'

Hemant Dhome Jhimma 2 : एक वर्षापूर्वी सिनेमागृहात धुमाकूळ घातलेल्या 'झिम्मा' सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमेने (Hemant Dhome) नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून 'झिम्मा 2'ची (Jhimma 2) घोषणी केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





Oscar Nominations 2023 : राजामौलींचा 'RRR' ते 'छेल्लो शो'; भारताच्या 'या' सिनेमांचा ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत समावेश!

Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा जगभरातील सिनेप्रेमींसाठी मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्स आज ऑस्करसाठी नामांकन मिळणाऱ्या सिनेमांची यादी जाहीर करणार आहे. 'ऑस्कर नामांकन 2023' (Oscar Nominations 2023) भारतासाठी खूपच खास असणार आहे. यात राजामौलींच्या (Rajamouli) आरआरआर (RRR) पासून ते बहुचर्चित 'छेल्लो शो' (Chhello Show) पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ

Gautami Patil : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यामुळे चर्चेत आहे. पण आता गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातारा (Satara) न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 



Sudheer Varma: साऊथ अभिनेता सुधीर वर्मानं केली आत्महत्या; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा

Sudheer Varma Suicide: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुधीर वर्मानं (Sudheer Varma) आत्महत्या केली आहे. सुधीरनं अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. सुधीरनं 23 जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सुधीर वर्माच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून सुधीर हा मानसिक तणावाचा सामना करत होता, असं म्हटलं जात आहे. सुधीरच्या निधनाने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.



Ram Gopal Verma: एसएस राजामौली यांच्या हत्येचा कट रचला जातोय, राम गोपाल वर्माचा दावा

Ram Gopal Verma: सोशल मीडियावरील पोस्टमुळे  प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा  (Ram Gopal Verma) हा नेहमी चर्चेत असतो. ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारा राम गोपाल वर्मा हा वेगवेगळ्या विषयांवरील ट्वीट शेअर करत असतो. राम गोपाल वर्मानं नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं सांगितलं की, काही चित्रपट निर्मात्यांचा गट हा प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या हत्येचा कट रचत आहेत. राम गोपाल वर्माच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 





Urfi Javed: 'क्या से क्या हो गया', उर्फीच्या ट्वीटनं वेधलं अनेकांचे लक्ष

Urfi Javed: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही सध्या चर्चेत आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधते. नुकताच उर्फीनं तिच्या नो मेकअप लूकमधील सेल्फी सोशल मीडियावर ( Social Media) शेअर केला. या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे.  उर्फीनं तिच्या नो-मेकअप लूकचा फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'क्या से क्या हो गया, एलर्जीचा परिणाम. आता मी कोणासारखी दिसत आहे?' उर्फीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सुप्रिया सुळे म्हणतात, 'मिर्झापूर प्रचंड आवडली अन् कालिनभैय्याला थेट फोनच लावला'; पंकज त्रिपाठी म्हणाला, 'मी बारामतीला...'


Supriya Sule Mirzapur Web Series : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांना अलिकडे आवडलेल्या वेबसीरिजबद्दल माहिती दिली आहे.  एका youtuber ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, मिर्झापूर (Mirzapur Web Series) माझी अलिकडच्या काळातील सर्वात आवडलेली. मी ही सिरीज पाहिल्यानंतर कालिन भैय्या पंकज त्रिपाठींना (Pankaj Tripathi) फोन केला. मला अनुप्रिया पटेलनं त्यांचा नंबर दिला. मी त्यांची फॅन असल्याचं सांगितलं. कालिन भैय्याचं पात्र मला खूप आवडलं असल्याचं मी त्यांना सांगितलं. मला पंकज त्रिपाठींनी सांगितलं की, मी बारामती, सातारा, फलटण या भागात फिरलो आहे.  आम्ही खूप वेळ बोललो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. अमर अकबर अॅंथोनी ही देखील आवडती फिल्म असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


Marathi Movies : मराठी सिनेसृष्टी पुन्हा बहरली! 'वेड' अन् 'वाळवी'वर उमटली प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर...


Ved Vaalvi Marathi Movies In Theater : बॉक्स ऑफिसवर (Box Office) सध्या 'वेड' (Ved) आणि 'वाळवी' (Vaalvi) हे दोन सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. कोरोनानंतर दोन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासोबत कमाईच्या बाबतीतदेखील उजवे ठरले आहेत.रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन चार आठवडे झाले असून या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. आतापर्यंत या सिनेमाने 55.22 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि सुबोध भावेच्या (Subodh Bhave) 'वाळवी'लादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


KL Rahul Athiya Shetty Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टीचं शुभमंगल सावधान, खंडाळ्यातील फार्महाऊसवर पार पडला विवाह सोहळा


KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे. 


100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार!


अथिया आणि केएल राहुल (KL Rahul Athiya Shetty Wedding) फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.