Dunki New Posters: 'इनके बारे में बहुत कुछ शेयर करना अभी बाकी है'; शाहरुखने शेअर केलं डंकी चित्रपटाचं नवं पोस्टर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Nov 2023 07:30 PM
Farah Khan Viral Video: फराहसाठी कायपण! फराह खान म्हणाली, "दिवाळीसाठी कपडे नाहीत", करण जोहरनं पाठवला पूर्ण वॉर्डरोब, पाहा व्हिडीओ
Farah Khan Viral Video: करणनं त्याची मैत्रिण फराह खानला (Farah Khan) पूर्ण वॉर्डरोब पाठवलं आहे.फराहनं एक व्हिडीओ शेअर करुन याबद्दल माहिती दिली. Read More
Dunki New Posters: "इनके बारे में बहुत कुछ शेयर करना अभी बाकी है"; शाहरुखने शेअर केलं डंकी चित्रपटाचं नवं पोस्टर
Dunki New Posters: किंग खानने डंकी या चित्रपटाचे दोन नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टर्सवरील कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Food Items Named After Celebrities: सनी लियोनी चाप अन् चिकन संजू बाबा; हॉटेलमधील चविष्ट पदार्थांना बॉलिवूड कलाकारांची नावं!
एका रेस्टॉरंटमध्ये चिकनच्या डिशला संजय दत्तचं (Sanjay Dutt) नाव देण्यात आलं आहे तर एका हॉटेलमधील चापला अभिनेत्री सनी लिओनीचं (Sunny Leone) नाव देण्यात आलं आहे. जाणून घेऊयात अशा पदार्थांबद्दल... Read More
Main Atal Hoon: "60 दिवस फक्त खिचडी खाल्ली"; अटल बिहारी वाजपेयींची यांची भूमिका साकारण्यासाठी पंकज त्रिपाठी यांनी अशी केली तयारी
मैं अटल हूं (Main Atal Hoon) या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. Read More
UT 69 Box Office Collection Day 1: रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला यूटी 69; राज कुंद्राच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
UT 69 Box Office Collection Day 1: यूटी 69 हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. या चित्रपटाच्या ओपनिंग-डे कलेक्शनबाबत जाणून घेऊयात... Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.