Elvish Yadav FIR : रेव पार्टीत सापाचं विष, परदेशी मुलींचा 'सप्लाय', FIR नंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 03 Nov 2023 03:22 PM
Salman Khan : सलमान खानच्या 'टायगर 3'ला मिळालं UA सर्टिफिकेट

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाला UA सर्टिफिकेट मिळालं आहे. 

Elvish Yadav FIR : रेव पार्टीत सापाचं विष, परदेशी मुलींचा 'सप्लाय', FIR नंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया
Elvish Yadav : बिग बॉस विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. Read More
UT 69 Review : राज कुंद्राचा 'यूटी 69' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Raj Kundra Movie : राज कुंद्राचा 'यूटी 69' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Elvish Yadav : 'बिग बॉस' विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल; ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा आरोप
Elvish Yadav FIR : 'बिग बॉस' विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. Read More
Urfi Javed : उर्फी जावेदला अटक? तोकडे कपडे घालणं पडलं महागात; पोलिसांनी ताब्यात घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
Urfi Javed : उर्फी जावेदने तोकडे कपडे घातल्याने पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
MC Stan : फुटपाथवर जागून काढल्या रात्री, गरीबीत गेलं बालपण.. 'बिग बॉस 16'चा विजेता 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन आता गाजवणार रुपेरी पडदा
MC Stan : 'बिग बॉस 16'चा विजेता 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन आता रुपेरी पडदा गाजवणार आहे. सलमान खानच्या (Salman Khan) सिनेमाच्या माध्यमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. Read More
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमात 'हे' कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत; दमदार कलाकारांची फौज असलेला 'पंचक'
Madhuri Dixit Movie : धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या 'पंचक' (Panchak) या मराठी सिनेमात दमदार कलाकारांची फौज आहे. या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत. Read More
Shah Rukh Khan : शाहरुखच्या वाढदिवशी 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; 34 मोबाईल फोन चोरीला
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांनी 'मन्नत'बाहेर (Mannat) तुफान गर्दी केली होती. या गर्दीत चाहत्यांचे 34 मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.