Elvish Yadav : युट्यूबरला मारहाण एल्विश यादवला भोवली, गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी देतानाचा व्हिडीओ व्हायरल
Elvish Yadav Viral Video : 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) फेम एल्विश यादवविरोधात युट्यूबरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Elvish Yadav Viral Video : 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) फेम एल्विश यादवच्या (Elvish Yadav) अडचणीत वाढ झाली आहे. सागर ठाकुर (Sagar Thakur) नामक एका युट्यूबरला मारहाण केल्याप्रकरणी एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्विशने मारहाण करतानाचा व्हिडीओ सागरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहे.
एल्विश यादवविरोधात कलम 147,149,323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील गुरुग्राममधील सेक्टर 53 पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एल्विशच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
Repost & say #ArrestElvishYadav#Gurgaon police should register a case against #ElvishYadav & his associates under IPC section 307 (attempt to murder).
— Ashwini Shrivastava (@AshwiniSahaya) March 8, 2024
Elvish attempted to murder an innocent teenager!
CC @gurgaonpolice @police_haryana @DGPHaryana @cmohry @mlkhattar pic.twitter.com/i45OuITxas
नेमकं प्रकरण काय?
युट्यूबर सागर ठाकूर उर्फ मॅक्सटर्नने एक्सवर (ट्विटर) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एल्विशविरोधात मारहाणीचा आरोप करताना दिसत आहे. तसेच त्याने सीसीटीव्ही फुटेजदेखील शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये एल्विश त्याच्या मित्रांसह सागरला मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी भडकले आहेत. तसेच पोलिसांनी एल्विशला ताब्यात घेण्याची मागणी करत आहेत.
I was brutally attacked and assaulted by @ElvishYadav, who openly issued death threats to me. All the evidence is available on the internet. But, When I went to the police station to file an FIR, the SHO lodged it under IPC 147, 149, 323, and 506. Unfortunately, these are… pic.twitter.com/UC2U4n1Gee
— Maxtern (@RealMaxtern) March 8, 2024
सागर ठाकूरने एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एल्विशने त्याला मारहाण केली असून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सागरने केला आहे. सागर आणि एल्विश एकमेकांना 2021 पासून ओळखतात. पण गेल्या काही दिवसांत एल्विश विचित्र वागत असल्याचं सागर म्हणाला. 8 मार्च 2024 रोजी रात्री 12 वाजता घडलेला हा प्रकार आहे.
एल्विश यादव इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, सागर ठाकूरने माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मी त्याला मारहाण केली आहे. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.
संबंधित बातम्या