एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

REVIEW - 'डोंबिवली रिटर्न' : अपेक्षा वाढवून पूर्ण करण्यात कमी पडलेला सिनेमा

सिनेमात आलेली गाणी पाहताना का? आणि कशासाठी? हा एकच प्रश्न मनात येतो. सिनेमाच्या सुरुवातीचं 'गोविंदा...' गाणं मात्र अपवाद ठरलं आहे. हे गाणं मस्त जमलंय आणि त्या गाण्यातूनच सिनेमा 'सुरु' होतो. बाकी गाणी फक्त डिस्टर्ब करतात, ज्यांची काहीच गरज नव्हती.

मुंबई : रोजच्या साचेबंद आयुष्यात कधी-कधी असं काहीतरी घडतं की ज्यामुळे सगळं आयुष्यच बदलून जातं. कधी ते बदल आयुष्याला सकारात्मक दिशा देणारे असतात तर कधी आयुष्याची माती करणारे असतात. या दोन्हीच्या टोकावर उभ्या असलेल्या माणसाची गोष्ट 'डोंबिवली रिटर्न' या सिनेमात रेखाटण्यात आली आहे.

अनंत वेलणकर नावाच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाची ही कथा आहे. डोंबिवलीत राहणारा अनंत मंत्रालयाच्या प्रसिद्धी विभागात काम करतो. बायको, मुलगी आणि लहान भाऊ असं त्याचं कुटुंब आहे. सकाळची 9.20 ची लोकल, ऑफिस आणि घर हाच त्याचा वर्षानुवर्ष सुरु असलेला दिनक्रम असतो. आणि मग 'तो' दिवस त्याच्या आयुष्यात येतो.

दहिहंडीच्या दिवशी एका बड्या हस्तीचा खून होतो. ज्याची लोकलपासून टीव्ही चॅनेलपर्यंत जोरदार चर्चा आहे. दुसऱ्या दिवशी अनंत वेलणकर जेव्हा त्याच्या कार्यालयात बसून दहीहंडीच्या कार्यक्रमाचे फोटोज चेक करत असतो तेव्हा त्याला एक फोटो सापडतो, जो फोटो त्या खूनाचा थेट पुरावाच असतो. त्यानंतर अनंत वेलणकर त्या फोटोचं काय करतो? त्याने त्याचं आयुष्य कसं बदलंत? या साऱ्याची गोष्ट म्हणजे महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित 'डोंबिवली रिटर्न' हा सिनेमा.

सिनेमा पहिल्या मिनिटापासून पकड घेतो. आपल्याला रिलॅक्स व्हायला अजिबात वेळ न देता थेट गोष्टीला सुरुवात होते. ते पाहाताना वातावरणात एक टेन्शन सतत जाणवत राहतं. त्याला पुरक असलेला कॅमेरा, पार्श्वसंगीत आणि अभिनय यामुळे मध्यंतरापर्यंत हे सगळं छान सुरु असतं. पण त्यानंतर सिनेमा ट्रॅक बदलतो.

दादासाहेब आणि अनंत वेलणकरमध्ये ज्या युद्धाची अपेक्षा पहिल्या हाफमध्ये निर्माण झालेली असते ते सोडून भलत्याच गोष्टी भलत्याच पद्धतीने घडायला लागतात. जे पाहाण्याशिवाय पर्याय नसतो. एकाचवेळी अनेक दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे सिनेमाचा तोल ढासळत जातो. क्लायमॅक्सचा चकवा तर थेट फसवलो गेल्याचीच भावना निर्माण करतो.

सिनेमात आलेली गाणी पाहताना का? आणि कशासाठी? हा एकच प्रश्न मनात येतो. सिनेमाच्या सुरुवातीचं 'गोविंदा...' गाणं मात्र अपवाद ठरलं आहे. हे गाणं मस्त जमलंय आणि त्या गाण्यातूनच सिनेमा 'सुरु' होतो. बाकी गाणी फक्त डिस्टर्ब करतात, ज्यांची काहीच गरज नव्हती.

थोडक्यात 'डोंबिवली रिटर्न' अपेक्षा वाढवून पूर्ण करण्यात कमी पडलेला सिनेमा आहे. पण तरीही एक फॅमिली-पॉलिटिकल-थ्रिलर सिनेमा पाहायचा असेल तर हा सिनेमा तुम्ही नक्की पाहा. या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार्स.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला वेगCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 3 डिसेंबर 2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे - संजय राऊतSunil Tatkare Navi Delhi : जास्त ठिकाणी लढलो असतो तर जागा जास्त मिळाल्या असत्या - सुनील तटकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Embed widget