Dobara Movie : एकता आर कपूर आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचा बहुप्रतिक्षित नवीन काळातील थ्रिलर 'दोबारा' (Dobara) 19 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होत आहे. तापसी पन्नूच्या या  चित्रपटाचे लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. दिग्दर्शक-अभिनेता जोडी 23 जून, संध्याकाळी 6 वाजता #LIFF2022 ओपनिंग नाईट गालामध्ये चित्रपट सादर करणार आहेत.


पुरस्कार विजेती अभिनेत्री तापसी पन्नूनं (Taapsee Pannu) या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले आहे आणि शोभा कपूर आणि एकता आर कपूर (कल्ट मूव्हीज, बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत नवीन शाखा) आणि सुनीर खेतरपाल आणि गौरव बोस (एथेना) यांनी याची निर्मिती केली आहे.


दोबारा हा नव्या जमान्यातील थ्रिलरपट असून यामध्ये तापसी आणि अनुराग तिसऱ्यांदा एकत्र येत आहेत. दोबारासोबत, तापसी आणि पावेल गुलाटी यांची हिट जोडी थप्पडच्या जबरदस्त यशानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे.


दोबारा, बालाजी मोशन पिक्चर्स, कल्ट मूव्हीजच्या नवीन विभागातील पहिला चित्रपट असून, आकर्षक, वेगवान आणि शैलीदार कथा सांगतो. हा चित्रपट 19 ऑगस्ट 2022 रोजी जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.


तापसीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती 


तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  तापसीचा ब्लर  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे. तापसीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तापसीचा  ‘शाबास मिथू’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर या चित्रपटाचं कथानक आधारित असणार आहे. 


हेही वाचा: