Drishyam 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), अभिनेत्री तब्बू (Tabbu) आणि श्रिया सरन (Shriya Saran) यांचा ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते आणि प्रेक्षकही या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची डेट जाहीर करण्यात आली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम 2’ हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.


अभिषेक पाठक दिग्दर्शित, या चित्रपटात अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता यांच्या दमदार भूमिका दिसणार आहेत. चित्रपटाची संपूर्ण टीम आज हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.


तब्बल 7 वर्षानंतर येणार सिक्वेल


‘दृश्यम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 7 वर्ष झाली आहेत. तब्बल 7 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दृश्यम 2'चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू झाले होते. यानंतर त्याचे उर्वरित शूटिंग गोव्यात पूर्ण झाले. 'दृश्यम' ही विजय नावाच्या माणसाची कथा आहे, जो चौथीत नापास झाला आहे. पण, त्याच्या कुटुंबाच्या हातून झालेल्या हत्येमुळे त्याला संपूर्ण कुटुंबाला पोलिसांपासून वाचवावे लागते. या चित्रपटात जबरदस्त सस्पेन्स होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. 2015 मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या 7 वर्षानंतर आता त्याच्या सिक्वलचे शूटिंग आता पूर्ण झाले आहे.


विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल का?


या चित्रपटाचे शूटिंग शुरू झाले तेव्हा अजय देवगण याने या सेटवरील एक झलक शेअर केली होती. या फोटोत त्याच्यासोबत अभिनेत्री श्रिया सरन आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक देखील दिसले होते. 'दृश्यम 2' च्या सेटवरील एक फोटो शेअर करत अजय देवगणने लिहिले होते की, 'विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल का? अजयने शेअर केलेल्या या फोटोत अजय देवगणसोबत चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रिया सरनही दिसत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने बॉलिवूड अभिनेत्री तब्बूलाही टॅग केले आहे. अर्थात, तब्बू पुन्हा एकदा 'दृश्यम'चा भाग असणार आहे.  'दृश्यम 2'चे शूटिंग आता पूर्ण झाले आहे.


हेही वाचा :


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर


Rashmirekha Ojha : अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची आत्महत्या; लिव-इन-पार्टनर कारणीभूत असल्याचा वडिलांचा आरोप