Shabaash Mithu Trailer : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता लवकरच तिचा  'शाबास मिथू' (Shabaash Mithu)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या (Mithali Raj) भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तापसीनं 'शाबास मिथू' चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


तापसीनं 'शाबास मिथू' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मिताली राज हे नाव तुम्हाला माहित असेल, पण या नावामागची स्टोरी जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. या महिलेनं  “The Gentleman’s game” ची नवी व्याख्या तयार केली. तिनं स्वत:ची कथा लिहिली. 15 जुलै 2022 रोजी हा चित्रपट तुमच्या भेटीस येणार आहे.' 'शाबास मिथू' चित्रपटाच्या या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


'शाबास मिथू' चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात तापसी पन्नू व्यतिरिक्त अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 


पाहा ट्रेलर:



15 जुलै 2022 रोजी ‘शाबास मिथू’  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘शाबास मिथू’ चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, तसेच महिला क्रिकेट संघाच्या आयुष्याभोवती फिरताना दिसणार आहे. मिताली राजने तिच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांचा सामना केला, पण तिने कधीही हार मानली नाही. चार विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून, तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  तापसीचा ब्लर  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे. तापसीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. 


हेही वाचा :


Taapsee Pannu : तापसी पन्नूला हविये ड्रामा फ्री वेडिंग; बॉयफ्रेंडबद्दल म्हणाली....