Naga Chaitanya : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत (Samantha Ruth Prabhu)  घटस्फोट घेतल्यानंतर साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) प्रचंड चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा अभिनेता प्रसिद्धी झोतात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, समंथाशी घटस्फोटानंतर चैतन्य आता पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. ‘मेड इन हेवन’ फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत (Sobhita Dhulipala) त्याचे नाव जोडले जात आहे. यासोबतच दोघेही एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. नागा आणि शोभिता यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.


नुकताच नागा चैत्यन्य याने हैदराबादमधील जुबली हिल्सवर नवीन घर खरेदी केले आहे. मात्र, सध्या येथे काम सुरू आहे. या नवीन घरात चैतन्य आणि शोभिता सतत एकत्र फेर फटका मारताना दिसत आहेत. चैतन्यने तिला आपले संपूर्ण घर दाखवले आहे. काही तास एकत्र घालवल्यानंतर दोघेही एकाच गाडीतून निघून गेले. याशिवाय शोभिता तिच्या ‘मेजर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्याच हॉटेलमध्ये चैतन्यला अनेकवेळा दिसला होता. शोभितानेही तिचा वाढदिवसही हैदराबादमध्येच साजरा केला होता.


नेमकं नातं काय?


यामुळेच दोघांमध्ये प्रेम बहरत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, नागा चैतन्य अशा अभिनेत्यांपैकी आहे, ज्यांना आपले वैयक्तिक आयुष्य कॅमेरासमोर आणणे फारसे आवडत नाही. आता, नागा चैतन्य आणि शोभिता यांच्यात खरंच काही नातं निर्माण होतंय की, दोघेही एकमेकांच्या सहवासात मैत्रीचा आनंद लुटत आहेत, हे लवकरच कळेल.


समंथा आणि नागाचा घटस्फोट


नागा चैतन्य आणि समंथा यांनी घटस्फोट घेण्यापूर्वीही दोघांबद्दल बरेच काही बोलले आणि लिहिले गेले होते. मात्र, दोघांनीही याबाबत नेहमी मौन बाळगले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनीही फॅमिली कोर्टात समुपदेशन केले होते. पण, समुपदेशन झाल्यानंतरही समंथा आणि चैतन्यने आपला निर्णय बदलला नाही.


समंथा आणि नागा चैतन्य यांनी गोव्यात 6 ऑक्टोबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नागा चैतन्यपासून वेगळे झाल्याची माहिती दिली होती.


हेही वाचा :


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर


Rashmirekha Ojha : अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची आत्महत्या; लिव-इन-पार्टनर कारणीभूत असल्याचा वडिलांचा आरोप