(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Disha Patani Tiger Shroff : दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफचं पॅचअप? ब्रेकअपनंतर पुन्हा एकत्र स्पॉट
Disha Patani Tiger Shroff : दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
Disha Patani Tiger Shroff Video : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर चर्चेत असणारी दिशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. दरम्यान टायगर श्रॉफ आणि (Tiger Shroff) आणि दिशा पाटनीचा (Disha Patani) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे चाहते नाराज झाले होते. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या पॅचअप झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दिशा आणि टायगर पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
दिशा आणि टायगर नुकतेच दिल्लीतील एमएफएन इव्हेंटदरम्यान एकत्र स्पॉट झाले आहेत. या इव्हेंटदरम्यान त्यांच्यासोबत टायगरची बहिण कृष्णा श्रॉफदेखील एकत्र दिसले आहेत. तसेच त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते एकत्र विमानात बसलेले दिसत आहेत. दिल्लीतून मुंबईत ते एकत्र आले आहेत. टायगर आणि दिशाला पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या ब्रेकअप चर्चांवर जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की,"टायगर आणि दिशा दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेकदा मी त्यांना एकत्र पाहिलेलं आहे. मी माझ्या मुलाच्या लव्ह-लाईफकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मला डोकवायचं नाही. पण मला वाटतं टायगर आणि दिशा एकमेकांचे चांगले मित्र आहेत".
टायगर-दिशाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Tiger Shroff Disha Patani Upcoming Movies)
टायगर श्रॉफ सध्या 'बडें मियां छोटे मियां' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तो अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे दिशा पाटनीचा 'योद्धा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या