मुंबई : उत्तर प्रदेशात त्या दिवशी हलकल्लोळ माजला होता. कारणच तसं होतं. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार झाला आणि सगळे पोलीस शहीद झाले. हा हल्ला केला होता कुख्यात गुंड विकास दुबे याने. त्यानंतर विकासला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार सरसावलं आणि कालांतराने त्याला एका मंदिरातून अटक करण्यात आली. इतकंच नव्हे, तर पुढे एका एन्काऊंटरमध्ये त्याला पोलिसांनी ठारही केलं. आता याच घटनेवर चित्रकृती बनणार आहे.


ही सगळी गोष्ट आत्ता आठवायचं कारण, असं की याच विकास दुबे यांच्यावर आता सिनेमा येतो आणि हा सिनेमा बनवणार आहेत दिग्दर्शक हंसल मेहता. विकास दुबेने एक दोन नव्हे तर तब्बल 8 पोलिसांना ठार केलं होतं. त्याच्या अटकेसाठी पाच लाखांचं इनामही ठेवण्यात आलं होतं. आता अलिगढ, ओमेरता, शाहीद अशा चित्रपटांचे दिग्दर्शक हंसल मेहता हा सिनेमा बनवणार आहेत. ही चित्रकृती वेबसीरीज स्वरुपातली असेल की, चित्रपट स्वरुपातली त्यात अद्याप अनिश्चितता आहे. सिनेवर्तुळात असलेल्या चर्चेनुसार काही मंडळी विकास दुबेवर हंसल मेहता हे
वेबसीरीज बनवत असल्याचं म्हटलं आहे, तर काही मंडळी चित्रपट बनवत असल्याचं म्हटलं आहे. येत्या काही दिवसांत या संभ्रमावर पडदा पडेल.



विकास दुबे आणि पोलिसांत झालेली चकमक आणि त्यानंतर त्याचा झालेला एन्काउंटर यावर ही चित्रकृती बेतलेली नाही. तर त्यात विकासचे राजकीय नातेसंबंध.. त्याचं नेटवर्क.. पोलिसांशी असलेले त्याचे लागेबांधे.. आदी गोष्टी आता या वेबसीरीजमधून येणार आहेत.


सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित चित्रपट


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नाव 'सुसाइट ऑर मर्डर' असे ठेवण्यात आले आहे. आता या चित्रपटात टिक-टॉक स्टार सुशांतची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये राहणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सचिनने इन्स्टाग्रावर पोस्ट करत तो चित्रपटात 'द आउटसायडर'ची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शामिक मौलिक करणार आहेत. तसेच चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या :