एक्स्प्लोर

दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट संपताच उडाला गोंधळ; शेकडो मोबाईल चोरीला, गर्दीत संधी साधत चोरट्यांचा डल्ला

Diljit Dosanjh Jaipur Concert : दिलजीत दोसांझचा जयपूर कॉन्सर्ट संपताच गर्दीत एकच गोंधळ उडाला. चोरट्यांनी यावेळी हात साफ केला. यामुळे 100 हून अधिक फोन चोरीला गेल्याची माहिती आहे.

Diljit Dosanjh Jaipur Concert Theft : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याचे देशविदेशात लाखो चाहते आहेत. दिलजीतच्या कॉन्सर्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच जयपूरमध्ये त्याचा कॉन्सर्ट मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कॉन्सर्टला आलेल्या चाहत्यांना मात्र मोठा फटका बसला. दिलजीतच्या कॉन्सर्टच्या गर्दीत चोरांनी चांगलाच हात साफ करुन घेतला. कॉन्सर्टनंतर अनेक चाहत्यांचे फोन चोरीला गेल्याची धक्कादायक भटना समोर आली. कॉन्सर्ट संपल्यानंतर एकच गोंधळ उडाला, यावेळी चोरांनी संधी साधत गर्दीतील लोकांचे फोन चोरले. कॉन्सर्टनंतर 100 हून अधिक जणांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती आहे. याप्रकरणी अनेकांनी एफआयआरही दाखल केले आहेत.

दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट संपताच उडाला गोंधळ

जयपूरमध्ये रविवारी दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट पार पडलं. या कॉन्सर्टमध्ये चोरीची मोठी घटना समोर आली आहे. कॉन्सर्ट दरम्यान 32 हून अधिक दर्शकांचे मोबाईल चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर तेथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कॉन्सर्ट संपल्यानंतर अनेक पीडितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दिलजीतकडे मदतीची विनंतीही केली आहे.

कॉन्सर्टमध्ये शेकडो मोबाईल चोरीला

रविवारी जयपूरमध्ये दिलजीच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी 32 जणांनी मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. कार्यक्रमात चोरीच्या घटना घडल्यानंतर आता एकाच दिवसात सांगानेर पोलीस ठाण्यात 32 मोबाईल चोरीच्या एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉन्सर्टगदरम्यान 100 हून अधिक फोन चोरीला गेले आहेत, पण त्यापैकी केवळ 32 गुन्हे नोंदवलं गेले आहेत, असं सांगितलं जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)

गर्दीत संधी साधत चोरट्यांचा डल्ला

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टचा बंदोबस्त, पोलीस आणि बाऊन्सर्सच्या कडेकोट बंदोबस्ताचा बोजवारा उडाला आहे. शो संपल्यावर अनेक प्रेक्षकांना त्यांचे फोन चोरीला गेल्याचं समजलं, त्यानंतर मोबाईल चोरीवरून प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. शोमध्ये ज्या लोकांचे फोन चोरीला गेले होते, त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. या सोबतच चाहत्यांनी त्यांचे चोरीचे मोबाईल परत मिळवण्यासाठी दिलजीत दोसांझकडे मदत मागितली आहे. 

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये सुरक्षेचा बोजवारा

View this post on Instagram
 
A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

बॉलिवूड अभिनेत्रीचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत मतदान, भारतीय नसल्याचं सत्य समोर येताच चाहत्यांना बसला धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तरZero Hour : महायुतीच्या आधीच अजित दादांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget