एक्स्प्लोर
दीपिकाच्या अंगठीची किंमत तब्बल...
दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिल्यापासून सर्वांच्या मनात दीपिकाच्या एंगेजमेंट रिंगने कुतूहल निर्माण केले आहे.

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या लग्नाच्या आधीपासूनच दोघांच्या कपड्यांपासून ते दीपिकाच्या दागिन्यांपर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा रंगत आहे. दीपिकाला साखरपुड्यात रणवीरने घातलेल्या अंगठीची किंमत किती हा प्रश्नदेखील अनेकांना पडला आहे. अनेकजण दीपिकाच्या अंगठीची किंमत गुगलवर शोधत आहेत. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्या हातातील अंगठीवर खिळल्या. दीपिकाच्या डाव्या हाताच्या चारही बोटांमंध्ये चार अंगठ्या दिसत आहेत. परंतु सर्वांची नजर तिच्या 'एंगेजमेंट रिंग'कडेच गेली. त्यानंतर सर्वांनाच दीपिकाच्या या अंगठीबद्दल कुतूहल वाटू लागले आहे. किती आहे अंगठीची किंमत? रणवीरने दीपिकासाठी लग्नाच्या खूप आधीच ही स्पेशल अंगठी खरेदी केली होती. या अंगठीची किंमत 2 ते 2.7 कोटी रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. रणवीरने दीपिकासाठी घेतलेली ही अंगठी सिंगल सॉलिटेअर स्केअर डायमंड रिंग या प्रकाराची आहे. अंगठीवर महागडे हिरे जडवलेले आहेत. अंगठीने मोडले विक्रम मागच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. विराटने अनुष्काला 1 कोटी रुपयांची हिऱ्यांची अंगठी घातली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा बॉयफ्रेंड निक जोनासने 2 कोटी रुपयांची अंगठी दिली होती. तर अभिनेत्री सोनम कपूरला तिचा नवरा आनंद अहुजा याने 90 लाख रुपयांची अंगठी घातली होती.
— Ranveer Singh (@RanveerOfficial) November 15, 2018
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















