एक्स्प्लोर
दीपिकाचा एक्स निहार पांड्याचं कंगनासोबत बॉलिवूड पदार्पण
रणबीर कपूर, रणवीर सिंग, सिद्धार्थ माल्ल्या यांच्यासोबत दीपिकाचं नाव जोडलं जाण्यापूर्वी निहार आणि दीपिका एकमेकांच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जातं
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेण्ड निहार पांड्या लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'क्वीन' कंगना राणावतच्या आगामी 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटात निहार झळकणार आहे.
मॉडेलिंगच्या काळात दीपिका आणि निहार रिलेशनशीपमध्ये होते. रणबीर कपूर, रणवीर सिंग, सिद्धार्थ माल्ल्या यांच्यासोबत दीपिकाचं नाव जोडलं जाण्यापूर्वी ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जातं. दीपिकाने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं, मात्र गेल्या दहा वर्षात निहारचं नाव कुठेच दिसलं नाही.
'मणिकर्णिका'मध्ये कंगनाचा रॉयल अंदाज
1857 च्या स्वातंत्र्यलढ्यावेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीशी लढा या चित्रपटात दाखवला जाणार आहे. या चित्रपटात निहार दुसऱ्या बाजीरावांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी निहारने अनेक अॅक्टिंग वर्कशॉप केल्याची माहिती आहे. अभिनयासोबतच मार्शल आर्ट्स, घोडेस्वारी, तलवारबाजी यासारख्या अनेक कला निहारने अवगत केल्या. मणिकर्णिका चित्रपटाच्या सेटवर शूटिंग करताना युद्धाच्या सीन्समध्ये निहारला अनेकवेळा जखमाही झाल्या. ऐतिहासिक व्यक्तिरेखा असल्यामुळे तिला न्याय देण्यासाठी निहारने पुरेपूर मेहनत घेतली आहे. क्रिश जगरलामुडी दिग्दर्शित मणिकर्णिका चित्रपटाची निर्मिती कमल जैन आणि झी स्टुडिओने केली आहे. कंगना, निहारसोबतच सोनू सूद, अंकिता लोखंडेही या चित्रपटात झळकणार आहेत. 27 एप्रिल 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement