एक्स्प्लोर
‘दंगल’फेम झायराचा अपघात, सुदैवाने कोणतीही दुखापत नाही!
श्रीनगर : ‘दंगल’फेम अभिनेत्री झायरा वसीमच्या कारचा अपघात झाला. या अपघातातून जायरा सुखरुप बचवली आहे. ‘दंगल’ सिनेमात अभिनेता आमीर खानच्या मुलीची भूमिका झायराने साकारली होती.
16 वर्षीय झायरा शुक्रवारी रात्री उशिरा आपल्या मित्रांसोबत जात असताना बुलेवार्ड रोडवर दुर्घटना घडली. गाडी वेगात असल्याने ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर गाडी फूटपाथवर चढली आणि रेलिंगला धडकली.
पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. शिवाय, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही झालेले नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
अभिनेत्री झायराने ‘दंगल’ सिनेमात पैलवान गीता फोगाट यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी जायराला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement