Dalljiet Kaur : पतीचे विवाहबाह्य संबंध? दलजीत कौरने व्हिडीओ शेअर करत दिली संसार तुटण्याची हिंट; म्हणाली,"मुलांसाठी शांत आहे"
Dalljiet Kaur : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संसार तुटण्याची हिंट आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं अभिनेत्री म्हणाली.

Dalljiet Kaur : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीतचं दुसरं लग्न तुटण्याची सध्या चर्चा आहे. अद्याप याबद्दल दलजीत कौर आणि तिचे दुसरे पती निखिल पटेल (Nikhil Patel) यांनी काहीही माहिती दिलेली नाही. पण दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नसोहळ्याचे आणि एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण आता अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत लग्न तुटण्याची हिंट दिली आहे.
मुलांसाठी शांत बसलेय दलजीत?
दलजीतने नववधूच्या रुपातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत दलजीतने लिहिलं आहे,"आपल्या मुलांसाठी ती शांत बसली आहे. तिला त्रास होऊ नये म्हणून कुटुंबीय तिला साथ देत आहे. ती प्रतीक्षा करत आहे".
View this post on Instagram
पतीचे विवाहबाह्य संबंध?
दलजीतने व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवरदेखील शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तुमचा काय विचार आहे? यासाठी जबाबदार कोण? मुलगी, पती की पत्नी?".
दलजीतचे चाहते तिची ही पोस्ट पाहून खूप हैराण झाले आहेत. तिच्या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तू खूप स्ट्रॉन्ग आहेस, अनेक महिलांसाठी प्रेरणा आहेस, देव तुला आणि तुझ्या लेकरांना आनंदी ठेवो, हिम्मत ठेव, तू काहीही चुकीचं केलेलं नाहीस, स्वत:ला खचू देऊ नकोस".
कोण आहे दलजीत कौर? (Who is Dalljiet Kaur)
दलजीत कौर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कुलवधू, इस प्यार को क्या ना दूं अशा अनेक लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. तसेच नच बलियेची ती विजेती ठरली होती. सलमान खानच्या 'बिग बॉस 13'मध्येही 2019 मध्ये ती सहभागी झाली होती.
दलजीत कौर आणि निखिल पटेल 18 मार्च 2023 रोजी थाटामाटात लग्नबंधनात अडकले. त्यानंतर ती आपल्या मुलाला घेऊन केनियाला गेली. केनियामध्ये ती निखिल आणि मुलीसोबत राहत आहे. पण काही महिन्यांतच ती भारतात परतली. त्यानंतर सोशल मीडियावरुन दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो डिलीट केले. फोटो डिलीट केल्यापासून त्यांच्यात बिनसलं असल्याची चर्चा होती. आता अभिनेत्रीने इनडिरेक्ट नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या























