एक्स्प्लोर

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाला कोर्टाकडून समन्स; 22 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीला 22 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Nawazuddin Siddiqui Wife Summon : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी तिची चौकशी देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकीला (Aaliya Siddhiqui) कोर्टाने समन्स बजावलं आहे. 22 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

नवाजच्या पत्नीने 2020 मध्ये दाखल केलेला गुन्हा

आलियाने आपला पती नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पॉक्सो (Pocso) कायद्याअंतर्गत तसेच इतर काही कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी नवाजच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की, 2012 साली मी माझ्या सासरी गेले होते. त्यावेळी दिराने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्यावेळी आलियाच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये झीरो एफआयआर दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण बुढाणा पोलीस स्टेशनला वर्ग केलं होतं.

कोर्टाने समन्स का बजावलं? 

या तक्रारीनंतर आलियाला एकदा कोर्टात हजर राहावं लागलं होतं, ज्यामध्ये तिने तिचा जबाब नोंदवला होता. मात्र, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासानंतर कोणत्याही प्रकारचा पुरावा न मिळाल्याने पॉक्सो कोर्टाने क्लोजिंग रिपोर्ट दाखल केला होता. या प्रकरणी आलियाला न्यायालयात हजर राहण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र ती हजर झाली नाही. यानंतर बुधवारी (8 फेब्रुवारी) न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली, मात्र आलिया तेव्हा देखील गैरहजर राहिली. आलिया सतत हजर न राहिल्यामुळे कोर्टात तिला समन्स पाठवलं आहे. आलियाला आता 22 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलं आहे.

नवाजुद्दीन आणि आलियाचा घटस्फोट

आलिया आणि नवाजुद्दीन 2010 साली लग्नबंधनात अडकले होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. वर्षभरातच त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी 2004 साली आलिया आणि नवाजुद्दीन रिलेशनमध्ये होते. त्यावेळीदेखील त्यांच्यात वाद व्हायचे. लग्नाआधी अनेकदा त्यांचं ब्रेकअप झालं होतं.  

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया कोण आहे? 

आलिया सिद्दीकी ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे. नवाजुद्दीन आधी आलिया 2008-09 साली राहुल नामक व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकली होती. पण नवाजुद्दीन आवडायला लागल्याने तिने राहुलला सोडलं. तर दुसरीकडे नवाजुद्दीनने आलियाशी लग्न करण्याआधी शीबा नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. नवाज आणि आलियाला शौरा आणि यानी ही दोन मुलं आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

आलियाने नवाजवर काय आरोप केले आहेत? 

आलियाने नवाजुद्दीनसह त्याने संपूर्ण कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. आलियाच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीने आलियाशी गैरवर्तन केलं आहे. तिला जेवण देखील दिलं जात नव्हतं. तसेच तिला एका खोलीत बंद केलं जायचं. नवाजुद्दीन मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलत नसे. गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि नवाजुद्दीन चर्चेत आहेत. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता 22 फेब्रुवारीला आलिया न्यायालयात हजर राहते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीवर गुन्हा दाखल, आईनेच केली तक्रार; वर्सोवा पोलीस करणार चौकशी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget