मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरात पसरलेल्या महामारीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याचसोबत सोशल डिस्टंसिंगचंही अपील केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच सर्व बॉलिवू़ड सेलिब्रिटींनीही कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल डिस्टंसिंग मेनटेन करण्याबाबत संदेश देणारे व्हिडीओ शेअर केले आहेत.


विद्या बालन : अभिनेत्री विद्या बालनने कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं अपील केलं आहे. तसेच यावेळी तिने एकत्र येणं म्हणजे, सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं असंही सांगितलं आहे.



अदीती राव हैदरी : अभिनेत्री अदीत राव हैदरीने सर्वांना अपील केलं आहे की, लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्यासोबतच आपल्याला सोशल डिस्टंसिंगचंही पालन करणं गरजेचं आहे. तसेच फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठीच घरातून बाहेर पडा असंही अदीतीने सांगितलं आहे.



सोनू सूद : अभिनेता सोनू सूदने सांगितलं आहे की, सोशल डिस्टंसिंग फॉलो करण्याचं अपील केलं आहे. तसेच डॉक्टर, पोलीस आपलं काम करत आहे, त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडू नका आणि कोणाच्याही जवळ जाऊ नका असं सांगितलं आहे.



विक्रांत मेस्सी : 'छपाक' स्टार विक्रांतने सांगितलं आहे की, सरकारची गाइडलाइन नक्की फॉलो करा. या महामारीपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.



झरीन खान : झरीन खाननेही लॉकडाऊन फॉलो करण्याचं आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचं अपील केलं आहे.



रवीना टंडन : अभिनेत्री रवीना टंडनने सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचं आवाहन करण्यासोबतच घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.



गोविंदा : अभिनेता गोविंदाने देखील चाहत्यांना सोशल डिस्टंसिंगचं आवाहन केलं आहे. त्याचसोबत कोरोनापासून दूर राहण्यासाठी सरकारच्या गाइडलाइन्सचं पालन करण्यासही सांगितलं आहे.



अर्जुन कपूर : बॉलिवूड अभिनेत्याने सोशल डिस्टंसिंगचं आवाहन केलं आहे.



अनिल कपूर : अभिनेता अनिल कपूरने चाहत्यांना घरीच राहण्याचं आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आपलं एक छोटसं पाऊल अनेकांचा जीव वाचवू शकतं.



कृति सेनन : अभिनेत्री कृती सेननने सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.



संबंधित बातम्या : 


राम गोपाल वर्मा यांचं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विट; नेटकरी म्हणाले अभिनंदन


Coronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनाग्रस्तांसाठी मदत


Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत