मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आज एक एप्रिल असल्याने कोणी कोरोनावरुन अफवा पसरवू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकार आणि पोलिसांना दिला होता. मात्र, तरीही दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट केलं. मात्र, हे ट्विट त्यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसते. कारण, भावना दुखावल्याने अनेक चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर उपरती येऊन माझ्या डॉक्टरने मला फूल केल्याचं त्यांनी सांगितले. दरम्यान, एका जबाबदार व्यक्तीने नियमांचे उल्लघन केल्याने प्रशासन राम गोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करणार का? असे प्रश्न आता सोशल मीडियावर विचारले जात आहे.


दरवर्षी एक एप्रिल हा दिवस लोकांना फूल म्हणजे फसवून साजरा केला जातो. मात्र, यंदा राज्यात आणि देशात कोरोना विषाणूचं संकट आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांच्या मनात या आजाराविषयी भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत आजच्या दिवशी कोणीही कुणाला फसवू नये. अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई केली जाईल, असं पोलीस आणि प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. कारण, सध्या सोशल मीडियावर आधीच कोरोना विषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहे.


निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे







कोरोना झाल्याबद्दल अभिनंदन
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नऊ वाजून 37 मिनिटांनी एक ट्विट केलं. ज्यात माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याचं लिहलं होतं. दरम्यान, यावर काही चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. तर, काही जणांनी राम गोपाल वर्मा कोरोना झाल्याबद्दल अभिनंदन अशा उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्या. बऱ्याच चाहत्यांना राम गोपाल वर्मा यांनी एप्रिल फूल केल्याचे समजले. काही चाहत्यांनी एकदम तिखट प्रतिक्रिया दिल्यानंतर 9 वाजून 51 मिनिटांनी राम गोपाल वर्मा यांनी दुसरे ट्विट केलं. ज्यात तुम्हाला निराश केलं त्याबद्दल माफ करा, माझ्या डॉक्टरने मला एप्रिल फूल केल्याचे लिहले. यानंतर चाहते आणखीच चिडल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही कोविड 19 अवार्ड मिस केला, असा टोलाही एका चाहत्याने लगावला. दरम्यान, यानंतर राम गोपाल वर्मा यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या गंभीर परिस्थितीत थोडी गम्मत करण्याचा प्रयत्न केला. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.


Corona Effect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विम्बल्डन स्पर्धेचं आयोजन रद्द


राम गोपाल वर्मांवर कारवाई होणार का?
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोणीही एप्रिल फूल करू नये. जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला होता. यासाठी सोशल मीडियावर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. असे असतानाही राम गोपाल वर्मा यांनी याचे उल्लघन केलंय. त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई होणार का? असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित होत आहे.

Central Health Ministery | 24 तासात 386 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा : आरोग्य मंत्रालय