मुंबई : सारा अली खान, करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा हात दिला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. तसेच 14 एप्रिलपर्यंत घोषित झालेल्या लॉकडाऊननंतर देशात मोठी आर्थिक मंदी येण्याचा धोका आहे. याशिवाय सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त मदतनिधीची गरज आहे.
टॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूडची कलाकार मंडळी देखील पंतप्रधान केअर फंडमध्ये डोनेशन करत आहेत. आता यात सारा अली खान, करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचाही समावेश झाला आहे. करिना कपूर खानने इंस्टाग्रामवर याबसंदर्भात पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
'संकटाच्या या काळात आपण सर्वांनी पुढे येऊन मदत करणं आवश्यक आहे. आम्ही दोघांनी यूनिसेफ, गिव्ह इंडिया आणि द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्यूजला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण सर्व एकत्र पुढे जाऊ. जय हिंद.' अशी पोस्ट करिना कपूरनं केली आहे. या पोस्टखाली तिनं करीना, सैफ आणि तैमुर अशी नावं दिली आहेत.
करिना कपूर खानची सावत्र मुलगी सारा अली खाननं देखील सोशल मीडियावरुन मदतनिधीत योगदान देणार असल्याची माहिती दिली आहे. या कलाकारांच्या मदतीचे आकडे गुलदस्त्यात आहेत. यापूर्वी अक्षय कुमारनंही 25 कोटी रुपयांचं डोनेशन दिलं आहे. दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील अनेकांनी कोरोनाशी दोन हात करायला छोट्या मोठ्या प्रमाणात मदतनिधी दिला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांकडूनही अशा प्रकारच्या सहाय्यतेची अपेक्षा आहे. अद्याप मोजक्याच कलाकारांची नावं समोर आली आहेत. कोरोनाग्रस्तांसाठी देण्यात आलेल्या मदतनिधींमध्ये उद्योगपती रतन टाटा यांनी 1500 कोटींची आणि मुकेश अंबानी यांनी 500 कोटी रुपयांची मदत केली आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत
लढा कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर
coronavirus | कोरोनाविरोधातील लढाईसाठी बीसीसीआयकडून 51 कोटींची मदत