Mukta Barve : कोरोना झाला अन् संधी गेली; मुक्ता बर्वेच्या हातातून निसटली 'ती' भूमिका
Mukta Barve : 'हवाहवाई' या सिनेमात निमिषा संजयन ऐवजी अभिनेत्री मुक्ता बर्वे दिसणार होती.
Mukta Barve : 'हवाहवाई' (Hawahawai) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या हा सिनेमा चर्चेत आहे. 'द ग्रेट इंडियन किचन' या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा संजयनं (Nimisha Sajayan) 'हवाहवाई' या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. पण निमिषाच्या जागी मराठमोळी, अभ्यासू अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) दिसणार होती.
'हवाहवाई' या सिनेमासाठी अभिनेत्री मुक्ता बर्वेला विचारणा झाली होती. पण तेव्हा मुक्ताला कोरोनाची लागण झाल्याने तसेच तिला 'अजूनही बरसात आहे' (Ajunahi Barsaat Aahe) ही मालिका मिळाल्याने तिने 'हवाहवाई' या सिनेमाला रामराम ठोकला. 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत मुक्ता उमेश कामतसोबत दिसून आली होती. मालिकेत मुक्ताने मीरा हे पात्र साकारलं होतं.
View this post on Instagram
'हवाहवाई'त कलाकारांची फौज
'हवाहवाई' या सिनेमात कलाकारांची फौज आहे. निमिषासह वर्षा उसगावकर, सिद्धार्थ जाधव, समीर चौघुले अशा दमदार कलाकारांची फौज 'हवाहवाई' या सिनेमात आहे. येत्या 7 ऑक्टोबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या लेखन, दिग्दर्शन आणि संकलनाची धुरा महेश टिळेकर यांनी सांभाळली आहे.
मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी ‘हवाहवाई’ सिनेमाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं ‘हवाहवाई’मध्ये गायलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या ठसकेबाज आवाजातही एक उत्तम गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.
'हवाहवाई' सिनेमात झळकणार 'हे' कलाकार
संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन हे कलाकार 'हवाहवाई' सिनेमात झळकणार आहेत.