Chak De India : 'चक दे इंडिया' गाणं कसं तयार झालं? मनाला भिडणाऱ्या गाण्याचा सलीम सुलेमान यांनी सांगितला किस्सा
Chak De India : शाहरुख खान (Shah Rukh Khan) अभिनीत 'चक दे इंडिया' हा सिनेमा 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
Chak De India : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'चक दे इंडिया' (Chak De India) हा सिनेमा 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शिमित अमीन (Shimit Amin) दिग्दर्शित हा सिनेमा सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवणाऱ्या या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
'चक दे इंडिया' हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता अनेक वर्षे झाली आहेत. पण तरीही सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. या सिनेमातील 'चक दे इंडिया' (Chak De India Song) हे गाणं सुपरहिट ठरलं आहे. या टायटल साँगला 70 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
..अन् 'असं' तयार झालं 'चक दे इंडिया' (Chak De India Making Story)
'चक दे इंडिया' या गाण्याचे संगीतकार सलीम मर्चेंट म्हणाले,"चक दे इंडिया' या गाण्याचे बोल फक्त प्रेरणादायी नसून मनाला भिडणारे आहेत. 'चक दे इंडिया' असं सिनेमाचं नाव होतं. त्या नावावरुन प्रेरणा घेत या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. विजयादरम्यानचे प्रसंग या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. सिनेमाच्या नावावरुनच देशभक्ती जागृत करणारं गाणं असावं असं वाटलं. सुरुवातीला तयार केलेलं गाणं निर्मात्यांना आवडलं नाही. त्यानंतर आम्ही या गाण्याच्या खूप वेगवेगळ्या 7-8 चाली तयार केल्या".
सलीम मर्चेंट पुढे म्हणाले,"निर्मात्यांनी पहिलं गाणं नाकारल्यानंतर आम्ही दुसरं गाणं तयार केलं. या दुसऱ्या गाण्यात आत्मा हरवत चालण्याने निर्मात्यांनी हे गाणं नाकारलं. सततच्या नकारानंतर मी हा सिनेमा न करण्याचं ठरवलं. पण त्यावेळी सुलेमान म्हणाला,"प्रयत्न करत राहुयात. काहीतरी करू,,नक्कीच काहीतरी सापडले". पुढे या सिनेमाच्या लेखकांना भेटलो आणि हे गाणं तयार केलं. हे गाणं आज अनेकांना प्रेरणा देणारं ठरलं आहे ही अभिमानास्पद बाब आहे".
'चक दे इंडिया' सिनेमाबद्दल जाणून घ्या..
'चक दे इंडिया' हा सिनेमा 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शाहरुख खान या सिनेमात कबीर खानच्या भूमिकेत आहे. शाहरुख खान हा कबीर खानच्या भूमिकेत भारतीय हॉकी संघाचा पूर्वीचा कप्तान असतो; पाकिस्तान संघाविरुद्धच्या पराभवामुळे त्याला संघामधून बाहेर काढले जाते. समाजातून त्याला आणि त्याच्या आईला बहिष्कृत केले जाते. तब्बल सात वर्षानंतर हरवलेली निष्ठा परत मिळवण्यासाठी तो विवादग्रस्त भारतीय महिला संघाची प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतो.
विवादग्रस्त संघ ते विश्वविजेता संघ या वाटचालीमध्ये खान प्रसिद्धी मिळवून समाजामध्ये उंच मानेने आपल्या आईसमवेत परत येतो. जे त्याला व त्याच्या आईला दुर्लक्षित करतात, तेच पुन्हा त्यांच्या स्वागताला येतात.
संबंधित बातम्या