Ananya Pandey : चंकी पांडेच्या लेकीचं ओटीटीवर पदार्पण, 'कॉल मी बे' सिरिजमधील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Ananya Pandey : अनन्या पांडे आता ओटीटीवर पदार्पण करत असून तिच्या नव्या सिरिजमधील गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Ananya Pandey New Series : चंकी पांडेची लेक आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिने 'स्टुडंट ऑफ द इयर-2' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर आता अनन्या ओटीटीवरच्या पदार्पणासाठीही सज्ज झालीये. तिची 'कॉल मी बे' ही वेब सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरिजचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या सिरिजमधील गाणंही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
चरण आणि बॉम्बे द आर्टिस्ट या जोडीने हे गीत संगीतबद्ध केलं असून शब्दही त्यांचेच आहेत आणि सादरही त्यांनीच केलं आहे. विशेष म्हणजे हे गीत या दोन्ही कलाकारांची ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पदार्पणातलीच कलाकृती असून याची निर्मिती दिशांत यांनी केली आहे.आता या जोडीचे ' वेख सोहनेया ' हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
गाण्यात नेमकं काय?
हे गाणं अनन्या उर्फ 'बे'ला मुंबईतील नव्या आयुष्यात पाऊल ठेवताना चित्रित करते. धकाधकीच्या घडामोडीत बे तिच्या जवळच्या मित्र - मैत्रिणीकडून आणि नव्या प्रियकराकडून स्वतःबद्दल अधिक जाणून घेते. स्वतःची ओळख आणि प्रेमाच्या गुंतागुंतीकडे घेऊन जाणाऱ्या एका तरुण स्त्रीचे म्हणजेच अनन्याचे चित्रण या गीतात ठळकपणे करण्यात आले असून पुढे काय घडणार हे दर्शविणाऱ्या या गीतामुळे प्रेक्षक ही वेब सिरीज पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक होतील.
वीर दास, गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, विहान समत, मुस्कान जाफेरी, निहारिका लिरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथूर यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'कॉल मी बे' ही करण जोहर, अपूर्वा मेहता यांच्यासह धर्माटीक एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. तर सोमेन मिश्रा या वेब सिरीजचे कार्यकारी निर्माते आहेत. ' कॉल मी बे ' या वेब सिरीजचे दिग्दर्शन कॉलिन डी'कुन्हा यांनी केले असून इशिता मोइत्रा यांची निर्मिती आहे. ही वेब सिरीज येत्या 6 सप्टेंबरपासून प्राईम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर 240 पेक्षा अधिक देशांत प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram