Brahmastra Box Office Collection : बॉलिवूड स्टार्स रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), मौनी रॉय (Mouni Roy), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि नागार्जुन (Nagarjuna) अभिनित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या (Brahmastra) रिलीजला आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. मात्र, यानंतर चित्रपटाची कमाई हळूहळू घसरताना दिसली. सातव्या दिवशी या चित्रपटाची कमाई पूर्णपणे गडगडली आहे. नुकतेच या चित्रपटाचे सातव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.
पहिल्या दिवशी धमाकेदार ओपनिंग केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला होता. पण, वीकेंडला दमदार कमाई केल्यानंतर, सोमवारपासून 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईत घट झालेली पाहायला मिळाली. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता आठवडा उलटला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सातव्या दिवशी अवघी 9 कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटाच्या कमाईत घट!
‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चांगला गल्ला जमवला होता. ‘ब्रह्मास्त्र’ची वीकेंडची कमाई पाहून सर्वांनाच चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, सोमवारपासून चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली. आतापर्यंत चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 170 कोटी रुपये झाली आहे. मात्र, या वीकेंडला चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.
आतापर्यंतची एकूण कमाई :
दिवस 1 : 37 कोटी
दिवस 2: 42 कोटी
दिवस 3: 45 कोटी
दिवस 4: 16.50 कोटी
दिवस 5: 12 कोटी
दिवस 6: 11 कोटी
दिवस 7: 9 कोटी
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद
अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे कौतुक करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे, तर काहींची या चित्रपटाला नापसंती मिळाली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या भूमिकेने मात्र अनेकांचे लक्ष वेधले. रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातील 'केसरिया', ‘देवा देवा’ या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे, तर दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. चित्रपटाचे बजेट 400 कोटींहून अधिक आहे. हा चित्रपट भारतातच पाच हजारांहून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. भारताशिवाय परदेशातही तीन हजारांहून अधिक स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :