Shahrukh Khan Brahmastra Video : दिग्दर्शक अयान मुखर्जीचा (Ayan Mukerji) ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासोबतच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नागार्जुन (Nagarjun) आणि  मौनी रॉय (Mouni Roy) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. पण या कलाकारांसोबतच एका खास कलाकाराची देखील चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर सध्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लूक व्हायरल होत आहे. 



शाहरुख खाननं 'ब्रह्मास्त्र'मध्ये 'वानरास्त्र' ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याने सुमारे 20 मिनिटांचा कॅमिओ केला. व्यक्तिरेखा लहान असली तरी शाहरुखनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. काही नेटकऱ्यांनी ब्रह्मास्त्र या चित्रपटामधील शाहरुखच्या लूकचा फोटो शेअर केला आहे.  


'ब्रह्मास्त्र चित्रपटाचा बेस्ट पार्ट शाहरुखची भूमिका हा आहे. चार वर्षांनंतर शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहिलं. खूप छान वाटलं. हा पर्फेक्ट कॅमिओ आहे.' असं कॅप्शन लिहून एका नेटकऱ्यानं शाहरुखचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 




'शाहरुखचा या चित्रपटातील 20 मिनिटांचा रोल हा चित्रपटाला वेगळ्या लेव्हलवर घेऊन जातो.' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं शेअर केलं आहे. 




एका युझरनं ट्वीट शेअर करुन लिहिलं, 'मी ब्रह्मास्त्र हा चित्रपट दुसऱ्यांदा पाहिला होता. कारण मला फक्त शाहरुखला बघायचं होतं.'







वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Brahmastra Collection : 'ब्रह्मास्त्र'ने रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी पार केला 100 कोटींचा आकडा; जगभरात केली 160 कोटींची कमाई