Falguni Pathak : 26 सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला (Shardhiy Navaratri) सुरुवात होत आहे.  नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत खास असतात. घरात, कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं.  दांडिया, गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. हिंदी मराठी गाण्यांवर लोक गरबा दांडिया खेळतात. 'गरबा साँग क्विन' गायिका फाल्गुनी पाठकच्या (Falguni Pathak)  गाण्यांवर गरबा किंवा दांडिया खेळणा नाही तर नवात्रोत्सव सेलिब्रेशन पूर्ण होत नाही असं म्हणतात. फाल्गुनी पाठकच्या वेगवेगळ्या गाण्यांवर नवात्रोत्सवात दांडिया किंवा गरबा खेळला जातो. तिच्या गाण्यांना चाहत्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात फाल्गुनी पाठकबद्दल...


फाल्गुनी पाठकचा जन्म 12 मार्च 1964 रोजी मुंबईमध्ये झाला. वयाच्या नवव्या वर्षी फाल्गुनीने पहिला स्टेज परफॉर्मन्स केला. तर दहाव्या वर्षी फाल्गुनीनं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. फाल्गुनी पाठक ही केवळ गायिकाच नाही तर परफॉर्मर देखील आहे. तिनं  ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘स्टार डांडिया धूम’, ‘बा बहू और बेटी’ या मालिकेमध्ये फाल्गुनी पाठक यांनी परफॉर्म केलं आहे. 


फाल्गुनी आहे 'गरबा साँग क्विन'


फाल्गुनी पाठकला 'गरबा साँग क्विन' असं म्हटलं जातं. फाल्गुनीच्या विविध अल्बम्समधील गाण्यांवर लोक गरबा आणि दांडिया खेळतात. ओढणी ओढू,परी हूँ मै, राधाने श्याम या फाल्गुनीच्या गाण्यांवर गरबा आणि दांडिया अनेक लोक खेळतात. नुकतेच तिचे वासलडी हे गाणं रिलीज झालं आहे. यंदा फाल्गुनीच्या या गाण्यावर लोक नक्कीच थिरकतील. ओ पिया, याद पिया की आने लगी, मैने पायल है छनकाई या फाल्गुनीच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


पाहा फाल्गुनीच्या नव्या गाण्याची झलक






वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Navratri 2022 : नवरात्रीमध्ये तयार करा खुसखुशीत कडकण्या; जाणून घ्या सोपी रेसिपी