एक्स्प्लोर

Boyz 3 : मराठीचा माज बेळगावात नाही तर मग कुठे करायचा?...; 'बॉईज 3' सिनेमाचा ट्रेलर आऊट

Boyz 3 : 'बॉईज 3' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Boyz 3 Movie Trailer Out : बॉईज सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर या त्रिकूटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. 'बॉईज' आणि 'बॉईज 2' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर 'बॉईज 3' (Boyz 3) काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच 'बॉईज 3' या सिनेमाचा  ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'बॉईज 3' सिनेमाचा ट्रेलर पाहून हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. लुंगीतलं हे कमाल त्रिकूट दक्षिण दिशेला करत असलेल्या प्रवासाची गोष्ट सिनेमात दाखवण्यात आली आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचे वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार ते सिनेमा पहिल्या नंतरच प्रेक्षकांना कळणार आहे. 

विदुलाचा कमाल अंदाज ,सुमंत शिंदे ,पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला 'बॉईज 3' हा सिनेमा येत्या 16 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमातील 'लग्नाळू 2.0' गाणं प्रेक्षकांना भरपूर आवडलं असून विदुलाची वेगळीच छबी या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. 

मैत्रीमध्ये एकमेकांना अडचणीत टाकणं असो किंवा त्याच अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची मदत असो मित्र नेहमीच हाजीर असतात. मैत्रीची व्याख्या नव्या अंदाजात या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांच्यातील मैत्री खरंच खूप धमाल असणार याचा ट्रेलरवरून अंदाज आला आहे. ‘मराठीचा माज बेळगावात नाही तर मग कुठे करायचा?, ‘तुम्हाला तुमच्या भाषेचा माज दाखवता येतो तर आम्हाला आमच्या भाषेची लाज राखता येते. ट्रेलरमधील हे संवाद प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात.

'बॉईज 3' या सिनेमाच्या ट्रेलरसंदर्भात अवधूत गुप्ते म्हणाला, 'बॉईज 3' या सिनेमाचा ट्रेलर पाहून या सिनेमासाठीची  प्रेक्षकांची वाढती उत्सुकता पाहून खूप भारी वाटत आहे. सर्वच 'बॉईज 3' च्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर हा सिनेमा खरा उतरेल याची मला खात्री आहे." 

दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाला,'बॉईज' आणि 'बॉईज 2' ला मिळालेल तुफान प्रतिसाद पाहता मनोरंजनात भर म्हणून यंदा 'बॉईज 3' तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. 16 सप्टेंबर ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे". 

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज 3' चे दिग्दर्शन विशाल देवरुखकरनं केलं असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या 16 सप्टेंबर रोजी 'बॅाईज 3' सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

ट्रेलर पाहा : 

संबंधित बातम्या

Boyz 3 : 'बॉईज' परत येतायत... सोशल मीडियावर झळकतोय 'बॉईज 3'चा ट्रेलर

Lagnalu 2.0 Song : 'बॉईज 3' मधील ‘लग्नाळू 2.0’ गाणं रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Embed widget